Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नगरसेवक काम करत नसल्यामुळे खूर्चीला बांधून गटाराच्या पाण्यात बसविले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेशHot News

नगरसेवक काम करत नसल्यामुळे खूर्चीला बांधून गटाराच्या पाण्यात बसविले

Surajya Digital
Last updated: 2020/11/23 at 4:47 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

वाराणसी : गटार, दूषित पाणी, कचरा अशा अनेक समस्यांचा सामना करत असलेल्या रहिवाश्यांनी तेथील स्थानिक नगरसेवकालाचा चांगलाच धडा शिकवला आहे. वाराणसीच्या बलुवाबीरमध्ये ही घटना घडली आहे.वाराणसी वॉर्ड क्रमांक 79 अंबियापूर बाजार क्षेत्रातील लोकांनी संतप्त होऊन हे टोकाचे पाऊल उचलले.

अनेकदा परिसरातील लोकांना करावा लागतो. नगरसेवक याकडे लक्ष देत नाहीत अशी तक्रारही स्थानिकांकडून केली जाते. लोकांच्या समस्या न सोडवणं एका नगरसेवकाला चांगलंच महागात पडलं आहे. स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. नगरसेवक काम करत नसल्याने स्थानिकांनी त्यांना दोरीने बांधून गटाराच्या पाण्यात बसवल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या बलुवाबीर परिसरातील लोकांना गेल्या कित्येक दिवसांपासून गटार आणि दूषित पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नगरसेवकाकडे याबाबत सातत्याने तक्रार केली पण त्यानी याकडे दूर्लक्ष केलं. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरसेवकालाच दोरीने बांधून गटाराच्या दूषित पाण्यात बसवलं. बऱ्याच दिवसांपासून त्रस्त असल्याने गावकऱ्यांनी रागाच्या भरात हे कृत्य केलं आहे.

तुफैल अंसारी असं या नगरसेवकाचं नाव आहे. या वॉर्डशी संबधित जवळील भागात बऱ्याच काळापासून गटारातील पाणी रस्त्यावर येत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही. दूषित पाणी प्यायल्यामुळे येथील लहान मुलं आजारी पडत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. स्थानिकांनी गटाराच्या समस्येविषयी अनेकदा नगरसेवकाकडे तक्रार केली. मात्र त्यांनी यावर कोणतीच उपाययोजना केली नाही.

गटारांचा प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिकांना गटाराच्या पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे. त्याच दरम्यान नगरसेवक त्या परिसरातून जात असलेले लोकांनी पाहिले. त्याच पाण्यात नगरसेवकाला एका खुर्चीवर बसवण्यात आलं आणि दोरीने बांधलं. त्यानंतर या भागातील काही नागरिकांनी विरोध करणाऱ्या लोकांशी चर्चा करीत नगरसेवकाची सुटका केली. लोकांनी केलेल्या या कृत्यांची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #नगरसेवक #कामकरत #नसल्यामुळे #खूर्चीलाबांधून #गटाराच्या #पाण्यात #बसविले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article …तरच मनसेशी युती करु, चंद्रकांत पाटलांची भूमिका तर मनसेचा दरेकरांना टोला
Next Article तौफिक भाई आपको मुंबई आना होगा, पैलवान हातातील ‘पतंग’ सोडून ‘घड्याळ’ बांधणार

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?