Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सत्यजित तांबेंनी बाजी मारली… मोठी आघाडी, निकालाअगोदरच झळकले विजयाचे पोस्टर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

सत्यजित तांबेंनी बाजी मारली… मोठी आघाडी, निकालाअगोदरच झळकले विजयाचे पोस्टर

Surajya Digital
Last updated: 2023/02/02 at 9:01 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यांनी आतापर्यंत जवळपास 31 हजार मते मिळवली आहेत. तर त्यांच्या विरोधात असलेल्या शुभांगी पाटील यांना 16 हजारांच्या जवळपास मते मिळालीत. Satyajit Tambe won… big lead, victory poster visible even before the result Nashik Aurangabad Nagpur पाटील यांना ठाकरे गट आणि काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर या ठिकाणी चमत्कार होईल, असा विश्वास त्यांना होता. मात्र शेवटी सत्यजित तांबे यांनीच येथे बाजी मारल्याचे चित्र सध्या दिसत आहेत.

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● औरंगाबादचा निकाल जाहीर… भाजपला धक्का》 नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे आडबाले विजयी

 

कॉंग्रेसने मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिल्यावरही त्यांनी अर्ज न भरता त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी भरल्याने खळबळ उडाली. तर यामुळे दुखावलेल्या भाजपच्या शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठींबा दिला. निवडणुकीच्या प्रचारात सत्यजीत तांबे यांच्या पाठीशी भाजपचे नेते आणि पदाधिकारी उभे असल्याचे चित्र दिसून आले होते. तर शेवटच्या टप्प्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी देखील तांबे यांना पाठींबा दिल्याने त्यांचे पारडे जड झाल्याचे मानले जात होते. आज दुपारी दोन वाजता नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना तांबे यांच्यापेक्षा निम्मी मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीत त्यांना अवघी 7 हजार 508 मते मिळाली असल्यामुळे त्या पिछाडीवर आहेत.

 

नाशिक पदवीधर मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली असून या ठिकाणी सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात लढत आहे. पहिल्या फेरीत सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. तर पाटील या पिछाडीवर पडल्या आहेत. या ठिकाणी उशिरा मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. तांबे यांच्या वडिलांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले होते. मात्र त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, पुण्यात हा निकाल जाहीर होण्याअगोदरच सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सत्यजीत तांबे यांचे पोस्टर पुण्याचे माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्याकडून लावण्यात आले आहेत. मात्र निकाल हाती येण्याअगोदरच हे पोस्टर्स लावण्यात आल्यामुळे त्याची चर्चा अधिक होत आहे. ‘जीत’ सत्याची, विजय ‘नव्या’ पर्वाचा! अशा स्वरूपाचा आशय त्या पोस्टर्सवरती लिहिण्यात आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात भरगोस मतांनी विजयी झाल्याबद्दल आमदार सत्यजीत तांबे यांचे अभिनंदन. असे देखील त्या पोस्टर्सवर लिहिण्यात आल्यामुळे त्याची चर्चा अधिक होत आहे.

 

● औरंगाबादचा निकाल जाहीर… भाजपला धक्का

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे विजयी झालेत. त्यांनी भाजपच्या किरण पाटील यांचा पराभव केला आहे. विक्रम काळे यांना 20195 मते मिळाली आहेत. तर किरण पाटील यांना 13570 मते मिळाली. त्यामुळे हा भाजपसाठी मराठवाड्यात मोठा धक्का समजला जात आहे. मात्र आम्हाला यावेळी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात मतदान झाले, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

》 नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे आडबाले विजयी

नागपूरमध्ये शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविका आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले हे विजयी झाले आहेत. सुधाकर आडबाले यांनी भाजपचे उमेदवार नागो गाणार यांचा पराभव केला आहे. गाणार यांच्यापेक्षा दुप्पट मते आडबाले यांनी मिळवली आहेत. नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. बालेकिल्ल्यातच भाजपचा पराभव झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी आडबालेंच्या विजयाची घोषणा केली.

 

 

 

You Might Also Like

मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार

इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी

राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार – निवडणूक आयोग

TAGGED: #SatyajitTambe #won #biglead #victory #poster #visible #beforeresult #Nashik #Aurangabad #Nagpur, #सत्यजिततांबे #बाजीमारली #मोठीआघाडी #निकालाअगोदरच #झळकले #विजय #पोस्टर #औरंगाबाद #नागपूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूर | प्रसाद खाल्ल्याने 137 भाविकांना त्रास, रुग्णालयात दाखल
Next Article लग्नाच्या आड येणा-या प्रेयसीला गळफास देऊन केला खून, ठोकल्या बेड्या

Latest News

मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार
राजकारण September 18, 2025
निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार
देश - विदेश September 18, 2025
सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात
सोलापूर September 18, 2025
इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र September 18, 2025
मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी
महाराष्ट्र September 18, 2025
तालिबानची अफगाणिस्तानात इंटरनेट आणि फायबर-ऑप्टिक सेवेवर बंदी
देश - विदेश September 18, 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी
महाराष्ट्र September 18, 2025
राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार – निवडणूक आयोग
राजकारण September 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?