Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वैद्यनाथ बँकेच्या चेअरमनला 10 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

वैद्यनाथ बँकेच्या चेअरमनला 10 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Surajya Digital
Last updated: 2020/10/19 at 7:54 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बीड : भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गाजत असलेल्या वैद्यनाथ बँकेचे चेअरमन  अशोक जैन यांना तब्बल दहा लाखांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेने बीड जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे बँकेच्या कारभाराला गालबोट लागले आहे.

आज अशोक जैन यांच्या परळी येथील राहत्या घरी औरंगाबाद लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून धाड टाकली तेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला. या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वैद्यनाथ सहकारी बँकही भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे.

‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…फेसबुक पेज, टेलिग्राम, ट्वीटर आणि शेअरचॅटवरही उपलब्ध

वैद्यनाथ बँकेने कळंब येथील  बँकेच्या एका सभासदाला अंदाजे अडीच कोटी रुपयाचे कर्ज प्रकरण मंजूर केले असल्याचे समजते. आणि त्या प्रकरणी चेअरमन अशोक जैन याने 15 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर आज 15 लाखांच्या रक्कमेपैकी  10 लाख रूपये आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास चेअरमन अशोक जैन यांच्या निवासस्थानी देण्याचे ठरले होते.

ठरलेल्या वेळेनुसार, तक्रारदार 10 लाखांची रक्कम घेऊन अशोक जैन यांच्या घरी पोहोचला. त्यावेळी औरंगाबाद येथील लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. यावेळी 10 लाखांची लाच घेत असताना अशोक जैन यांना रंगेहात पकडण्यात आले.

You Might Also Like

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #वैद्यनाथबँक #दहालाखलाच #चेअरमनअशोकजैन #गालबोट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थिल्लर; कर्ज काढा, पण मदत करा
Next Article मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते वारसदारांना धनादेशाचे वाटप

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?