Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चिनी फॅक्ट्रीतील हिंसक रोबोटचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, दोघे गंभीर जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

चिनी फॅक्ट्रीतील हिंसक रोबोटचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, दोघे गंभीर जखमी

admin
Last updated: 2025/05/05 at 5:02 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

बीजिंग, 5 मे (हिं.स.)।चीनच्या फॅक्ट्रीतील एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरलं होत आहे. यामध्ये एक इंडस्ट्रियल रोबोट अचानक अनियंत्रित होऊन हिंसक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही दुर्घटना तांत्रिक बिघाडमुळे घडली आहे. या दुर्घटनेत २ कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

या व्हायरलं व्हिडिओत स्पष्टपणे दिसते की, फॅक्टरीत काम करताना रोबोटचा अचानक कंट्रोल बाहेर जातो, त्यानंतर तिथं उपस्थित २ कर्मचाऱ्यांवर हल्ला करायला लागतो. जसा हा प्रकार घडतो तसं कंपनीत गोंधळ उडतो. कर्मचारी त्यांचा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळतात. माहितीनुसार, यूनिट्री रोबोटिक्सनं बनवलेल्या H1 नावाच्या रोबोटमुळे ही दुर्घटना घडली. या रोबोटची किंमत ६.५ लाख रुपये आहे. तो एक ह्यूमनॉइड रोबोट आहे. जो माणसासारखा वागतो. मात्र या रोबोटच्या प्रोग्रामिंगमध्ये आलेल्या छोट्या चुकीमुळे मोठी घटना घडली.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना फॅक्टरीतील इतर कर्मचाऱ्यांनी नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर सुरक्षा मानक आणि रोबोटच्या प्रोग्रामिंगची तपासणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे अशी दुर्घटना पहिल्यांदाच घडली नाही. याआधीही रोबोट नियंत्रणाबाहेर गेल्याच्या बातम्या आहेत. काही महिन्यांपूर्वी एका टेक फेस्टिवलमध्ये रोबोट अचानक लोकांच्या दिशेने धावला, त्यामुळे लोक घाबरले होते. यासारख्या घटनांमुळे आपण तंत्रज्ञानावर इतका भरवसा ठेवू शकतो का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून त्यावर लोकांच्या विविध प्रतिक्रियाही समोर येत आहेत. या दुर्घटनेनंतर फॅक्टरीत कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाढवली असून रोबोटिक यूनिट्सची पुन्हा चौकशी सुरू केली आहे.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बोगस बियाणे, खते औषधी विकली जाणार नाही याची दक्षता घ्या – आ. प्रवीण तायडे
Next Article बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 91.88टक्के

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?