Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिव्यदृष्टीतला अंत्योदय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिव्यदृष्टीतला अंत्योदय

admin
Last updated: 2025/05/10 at 1:43 PM
admin
Share
7 Min Read
SHARE

जिल्हाधिकारी कार्यालयात आता सहाय्यता निधी स्वतंत्र कक्ष

” देशाला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. त्या पुर्वकाळात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दुरदृष्टी ठेवत अंत्योदय सिद्धांत जगाच्या समोर मांडला होता. अंत्योदय याचा अर्थ काय ? तर शेवटच्या माणसाला विकास तथा सहकार्याच्या प्रक्रियेत घेवून जाणे होय. कालांतराने काँग्रेसी सरकार व्यवस्था या देशात आणि राज्यात अनादी वर्षे राहिली. ज्यामुळे सरकारी पातळीवर सिद्धांताची अंमलबजावणी झाली नाही. २०१४ नंतर देशात आणि राज्यात भाजपाचे नेतृत्व सुवर्ण युगासारखं उदयास आलं. ज्या व्यवस्थेने वर्तमानकाळात अंत्योदय सिद्धांताचा पुरस्कार केल्यामुळे “सबका साथ, सबका विकास” हे केवळ कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात उतरताना दिसून येते.

राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विकासाची जशी दृष्टी त्याहून अधिक समाजातल्या शेवटच्या माणसाच्या कल्याणाची दुरदृष्टी असल्याने अत्यंत गरज असलेल्या सामान्य लोकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा कक्ष आता जिल्हाधिकारी कार्यालयातच उभा केल्याने गरजूंना मुंबईच्या खेटा मारण्याची आता यापुढे गरजच उरणार नाही. राजा जेव्हा नेतृत्व करतो. तेव्हा त्याच्या अंगी प्रजा कल्याणाची दृष्टी असेल तर राज्यातील जनता सर्वांग दृष्टीने सुखी, समाधानी झाल्याशिवाय निश्चितच रहात नाही. तो अनुभव सध्या वर्तमान महाराष्ट्राच्या राजकारणात पहायला मिळतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेत संवेदनशीलता नेहमीच पहायला मिळते.

विकासाची स्वत:ला भुक आणि दृष्टी व्यापक असल्याने नदीच्या प्रवाहासारखा विकास नावांच्या घटकाचा प्रवास राज्यभर सुरू आहे. नेतृत्व करताना समाजातील अठरापगड जातीधर्माच्या लोकांना सोबत घेवून वंचित, उपेक्षित, कष्टकरी, शेतकरी, युवा, बेरोजगार यांना सोबत घ्यायचं आणि त्यांच्यासाठी काही तरी करायचं म्हणजेच “सबका साथ-सबका विकास” हे सुत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंमलात आणलं. तेच या राज्यात फडणवीसांनी राबवून दाखवलं. कधी कधी विरोधक देखील त्यांच्या विकासाच्या दृष्टीचे कौतुक करतात. केवळ विकास हेच साध्य आहे का ? तर नेतृत्व करताना समाजातील जो शेवटच्या रांगेत उभा असलेला सामान्य माणूस त्याला निश्चित प्रवाहात आणायला हवे, ही त्यांच्या र्‍हदयातली मुळ कल्पना ज्याला सेवाभाव असं देखील म्हणता येईल.

भाजप परिवाराच्या पुर्वजांनी तसं पहाता स्वातंत्र्यपूर्व काळातच या देशाला कल्याणकारी सिद्धांताच्या अनेक महत्वपूर्ण दिशा देणार्‍या गोष्टी सांगून ठेवल्या. ज्यामध्ये पंडित दीनदयाळ यांनी मांडलेला अंत्योदय सिद्धांत किंवा डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी तत्कालीन काळातच काश्मिर प्रश्नावर ३७० कलम रद्द करावं यासाठी दिलेलं बलिदान. एवढेच नव्हे तर संघ संस्थापक डॉ.हेडगेवारांनी देखील १९२५ दरम्यान संघाची स्थापना करताना या देशाला मानवतावादी कल्याण त्यातून शेतकरी विकासाच्या कल्पना आणि गरिबांचं कल्याण या बाबतीत लक्ष्य वेधले होते. दुर्दैवाने त्या काळात काँग्रेसी विचार सर्वदूर पसरला होता. स्वातंत्र्यानंतर व्यवस्थेत देखील काँग्रेसवाले आले ज्यांनी जनसंघ, भाजपा तथा परिवारांनी मांडलेल्या अनेक राष्ट्रहिताच्या, समाजकल्याणाच्या, गरिब उत्थानाच्या जगासमोर येवू दिल्या नाहीत.

याउलट मुस्कटदाबी करत हा विचार दाबून ठेवला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नेहरू निती, इंदिरा गांधींची आणिबाणी या सर्व गोष्टी जग कल्याणाच्या विचाराला पायदळी ठेवण्यात कारणीभूत निश्चितच राहिल्या म्हणाव्या लागतील. सहज कल्पना केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरमधील ३७० कलम हटवून दाखविले.ज्यासाठी डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांनी १९५२ च्या दरम्यान बलिदान दिले. मागे वळुन पहाताना तत्कालीन काळातली ३७० ची किंमत खर्‍या अर्थाने तदनंतर व्यवस्थेने कलम ठेवल्याने देशाला किती मोजावी लागली ? वर्तमानकाळात पहायला मिळते.

स्पष्टच सांगायचं झालं तर देशाचं दुर्दैव म्हणावे लागेल की, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर काळात या देशाला हेडगेवारांचा विचार त्याचबरोबर पंडित दीनदयाळ उपाध्याय, शामाप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी यांच्या मनातल्या कल्पना अंमलात आणण्याइतपत ताकद नव्हती. अन्यथा आजचा भारत जो नव्याने घडतो आहे. तो त्या काळात या थोरांच्या बदलान्वये घडला असता तर मग ना पाकिस्तान, ना बांग्ला. हम सारे एक है हाच नारा देशात घुमला असता. कधी-कधी प्रश्न हाही पडतो. की, खरंच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेतृत्व देशात नसते तर मग काल झालेले ऑपरेशन सिंदुर झालेच असते का ? प्रश्न संशयाचा वाटत असला तरी काँग्रेसी व्यवस्थेत दहशतवाद्यांनी अनेकदा हल्ले केले पण, कुणी प्रतिउत्तर देण्यासाठी पुढे आले नाही. अर्थात कुरापती काढण्याची वेळ नसली तरी कोणत्या व्यवस्थेमुळे या देशाला यातना भोगाव्या लागल्या हे विसरून कसे चालणार ? देश असो किंवा राज्य नेतृत्वाच्या अंगी दिव्य दृष्टी असणेच योग्य ज्यामुळे चराचर जिवाचे कल्याण त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाच्या वर्गसमुहाला विकासाच्या प्रवाहात घेवुन जाण्याचा विचार प्राप्त होवु शकतो.

जो विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भुमिकेत पहायला मिळतो. मुख्यमंत्री बोलतात तेच करून दाखवतात हे वारंवार राज्यात पहायला मिळते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी स्वतंत्र विभाग खर्‍या अर्थाने २०१४ नंतर त्यांनी राज्यात सुरू केला. ज्याचा फायदा गोरगरिब जनतेला निश्चितच होताना दिसतोय. तिसर्‍यांदा पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर सहाय्यता निधीच्या गरिब रथावरच त्यांनी विशेष लक्ष्य घातले. एक गोष्ट खरी आहे की, गरजू रूग्णांना या उपक्रमाद्वारे मुंबईस्थित येणे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रश्नाला तोंड देणे लक्षात येताच पुन्हा त्यांनी एक व्यापक गरीब विचार लक्षात घेता निवडणुक प्रचारातच बदल करण्याचं सांगुन ठेवलं होतं. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातच आता मुख्यमंत्री सहाय्यता निधी १ मे पासून संपुर्ण राज्यात कार्यान्वित केला. यासाठी शासकिय स्तरावर संबंधित वरीष्ठ अधिकारी यांची समिती गठीत करून गरजू अर्जाचा निकाली अंमलबजावणी तात्काळ करण्याचे सुचित केले. वास्तविक पहाता गरीबाला वैद्यकिय मदत सरकार म्हणून दरवाजावर आणून ठेवली हे नसे थोडके.

मदत घेवु पहाणार्‍या गरजूंना आता मुंबईचे खेटे बंद झाले. सहाय्यता निधीची पद्धत देखील सोयीची ज्यामधुन अनेक अडचणी दुर केल्या. लोक आता वैद्यकिय मदत घेण्यासाठी मुंबईला जात नसून जिल्ह्याच्या कचेरीत जायचं, अर्ज करायचा आणि थेट मदत रूग्णांना मिळणार. त्यामुळेच तर “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” असं जरी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. किती मोठी व्यापकता आणि दुरदृष्टी या जिल्हाधिकारी स्तरावर सुरू केलेल्या सहाय्यता निधीची हे खर्‍या अर्थाने गरजवंतांची चेहरे पाहिल्यानंतर लक्षात येते.

हेच अपेक्षित होतं ज्या पंडित दीनदयाळ यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सिद्धांत मांडून व्यवस्थेला दिशा देण्याचा प्रयत्न केला. तो काँग्रेस व्यवस्था असल्याने अंमलात आला नाही. वर्तमान सामाजिक आणि राजकिय काळात केंद्र तथा राज्यात मात्र अंत्योदय सिद्धांताची अंमलबजावणी होताना दिसते. शेवटच्या रांगेतील सामान्य माणुस ज्याला सत्ता व्यासपीठाच्या सोबत घेणे आणि विकासाच्या प्रवाहात आणून आर्थिक क्रांती त्यांच्यात घडवणे यापेक्षा सिद्धांताचा उद्देश दुसरा कोणता ?…..म्हणुनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिव्यदृष्टीचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पाकिस्तानकडून रुग्णालय व शाळांवर हल्ले- कर्नल कुरेशी
Next Article पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त आयुक्त मृत्यूमुखी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?