Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वारकर्‍यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा समजून काम करावे : प्रकाश आबिटकर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

वारकर्‍यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा समजून काम करावे : प्रकाश आबिटकर

admin
Last updated: 2025/06/14 at 5:41 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर, 14 जून (हिं.स.)।आषाढी यात्रा सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक सहभागी होतात. सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. वारकर्‍यांची आरोग्य सेवा करणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. वारकरी सेवा हीच पांडुरंगाची सेवा समजून प्रत्येकाने सेवाभावाच्या भावनेने कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

पंढरपूर येथे आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांना देण्यात येणार्‍या आरोग्य सुविधेबाबतचा आढावा घेतला आणि वाखरी पालखी तळाची पाहणी केली. यावेळी मंत्री आबिटकर बोलत होते. या बैठकीस आ. समाधान आवताडे, आ. राजू खरे, सीईओ कुलदीप जंगम, डॉ. विजय कंदेवार, डॉ. संदीप सांगळे, डॉ. राधाकिशन पवार, सचिन इथापे, डॉ. सुहास माने, डॉ. संतोष नवले, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. महेश सुडके आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले की, प्रत्येक वारीत आरोग्य विभागाने चांगले काम केले आहे. या वारीतही आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करुन वारकरी, भाविकांना अधिकच्या सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात. साथरोग नियंत्रणाच्या दृष्टीने पालखी सर्व मार्गावरील पाणी स्त्रोतांचे सर्वेक्षण तसेच पाणी नमुने तपासणी करावी. पालखी मार्गावरील संबंधित गावातून पालखी सोहळे मार्गस्थ झाल्यानंतर त्याठिकाणची स्वच्छता करावी. तत्काळ औषध फवारणी करावी. तसेच स्थानिक नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. —————

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर – चंदनउटी पुजेतून मंदिर समितीला 35 लाखांचे उत्पन्न
Next Article नोटरी करून एकाच जागेची अनेकांना विक्री

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?