Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्रात घडवून आणू कबड्डीचा सर्वात मोठा महाकुंभ – उपमुख्यमंत्री पवार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

महाराष्ट्रात घडवून आणू कबड्डीचा सर्वात मोठा महाकुंभ – उपमुख्यमंत्री पवार

admin
Last updated: 2025/05/05 at 4:55 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 5 मे (हिं.स.)

भारतीय पारंपरिक कबड्डीचा खेळ आज व्यावसायिक खेळतही आपले अस्तित्व टिकवून आहे. कबड्डी स्पर्धाच्या प्रकार व स्वरूपात बदल झाल्याने आज संपूर्ण विश्वात कबड्डीचा डंका वाजत आहे. ऑल इंडिया फेडरेशन कपच्या निमित्ताने संपूर्ण कबड्डीचीं पंढरीचं अमरावतीत अवतरली असून आगामी काळात कबड्डीच्या कुंभमेळा भरविण्यासाठी शासन कबड्डी व खेळाडूंना सर्वोतोपरीयंत सहकार्य करणार असल्याचा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला.

विदर्भ अँमॅचूअर कबड्डी असोसिएशन, अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन व शोध प्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने आयोजित 4th ऑल इंडिया फेडरेशन कप पुरुष /महिला कबड्डी स्पर्धा 2025 च्या अंतिम दिवशी अजित पवार यांनी स्पर्धेला भेट दिली. यावेळी त्यांनी आयोजनाची भरभरून प्रशंसा करीत खेळाडूंना शुभेच्छा प्रदान केल्यात. या स्पर्धेमधून भारतीय विश्वकप पुरुष व महिला संघ निवडला जाणार असल्याने उपमुख्यमंत्री महोदयांनी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रो-कबड्डी व इंटरनॅशनल खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. दरम्यान आ. सुलभा खोडके, भारतीय कबड्डी फेडरेशनचे महासचिव जितेंद्र ठाकूर, शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके यांनी त्यांचे स्वागत केले.

पुढे बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आजचा दिवस अमरावतीसाठी अभिमानाचा दिवस असून ऑल इंडिया फेडरेशन कपचा थरार अनुभवणे हा एक सुखद व अविस्मरणीय क्षण आहे. ही एवढी चांगली व्यवस्था आपण कधीही पाहिली नाही. पाहुण्या माणसांचे आदरातिथ्य कसे करायचे हे खरोखरच अविस्मरणीय आहे. आपल्या मातीच्या खेळातून आपला म्हणून व संस्कृती जपली जात असल्याचे गौरवपूर्ण उदगार अजित पवार यांनी व्यक्त केले.

दरम्यान अजित पवार यांनी पुरुष गटातील सर्व्हिसेस विरुद्ध राजस्थान या पहिल्या सेमीफायनल सामन्यांचा आनंद लुटला. तसेच सेमी फायनल खेळत असलेल्या इंडियन रेल्वे विरुद्ध तामिळनाडू महिलांच्या संघांचे सुद्धा उपमुख्यमंत्री महोदयांनी कौतुक केले.यावेळी क्रीडारसिक,प्रशिक्षक तसेच संपूर्ण राज्यातून आलेले सर्वजण क्रीडापटुंना टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवीण्यासाठी अविरतपणे सातत्याने पुढाकार घेत असल्याचे चित्र याप्रसंगी लक्षवेधी ठरू पाहत होते.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महापर्यटन उत्सवात मुख्यमंत्र्यांनी घेतला सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद
Next Article अंबा एक्सप्रेस सीएसटीपर्यंत चालविण्यात यावी – नवनीत राणा

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?