सोलापूर-विशेष प्रतिनिधी
भारतात सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ थांबण्याऐवजी वाढतच चालला आहे.पुण्यातील एका उद्योगपतीची सायबर गुन्हेगांरांनी हत्या केल्याने देशभरातील उद्योग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून पोलीस दलही चक्रावून गेले आहे. कोथरूडमध्ये वास्तव्यास असलेले लक्ष्मण शिंदे असे हत्या झालेल्या उद्योगपतीचे नाव आहे. बनावट मेलद्वारे या गुन्हेगारांनी शिंदे यांच्या संपर्क साधला आणि त्यांना पाटण्यात बोलावून घेतले.तिथेच त्यांची हत्या करण्यात आलचे सांगण्यात येते.
गेल्या काही दिवसांपासून सायबर हल्ल्याच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. अनेकदा सायबर गुन्हेगार हे ओटीपी मागण्यासाठी फोन करतात. ते पैशांचे आमिष दाखवून अनेक नागरिकांना गंडा घालतात. ते आधी 10 ते 12 हजार रुपये आपल्या बँक खात्यात टाकतात. पैशांचे आमिष दाखवून नंतर सर्वसामान्य नागरिकांना लुटतात. सायबर गुन्हेगारांचे असे कारनामे तर सर्वांना माहिती आहेत. पण आता या सायबर गुन्हेगारांची हिंमत आणखी वाढली आहे. या सायबर गुन्हेगारांकडून आता थेट उद्योगपतीचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यापर्यंत मजल गेली आहे.
पुण्यात एका उद्योगपतीची सायबर हत्या करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. कोथरुड येथे वास्तव्यास असलेले उद्योगपती लक्ष्मण शिंदे यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मण शिंदे यांची बिहारच्या पाटण्यात हत्याा करण्यात आली. कंपनीच्या कामासाठी मेल करत उद्योगपतीला पाटण्यात बोलवण्यात आले. स्वस्तात मशीन मिळेल, असे सांगत लक्ष्मण शिंदे यांना आरोपींनी पाटण्यात बोलावले होते. आरोपींनी बनावट मेल आयडीद्वारे शिंदे यांच्याशी संपर्क केला होता अशी माहिती आता उघड झाली आहे.
शिंदे हे बेपत्ता असल्याची तक्रार
शिंदे यांचे 11 एप्रिलला संध्याकाळी त्यांच्या पत्नी रत्नप्रभा यांच्यासोबत शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला होता. कुटुंबियांनी शिंदे यांच्यासोबत संपर्क करण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता. पण संपर्क होत नव्हता. त्यामुळे घाबरलेल्या शिंदे कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार केली होती. पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात शिंदे हे बेपत्ता असल्याचीदेखील तक्रार नोंदवण्यात आली होती. तपासादरम्यान सोमवारी पाटण्यात शिंदे यांचा मृतदेह आढळल्याची माहिती समोर येत आहे.
शिंदे यांची पुण्याजवळील खेड शिवापूर येथे गाड्यांमध्ये असणार्या बेरिंगच्या निर्मितीची मोठी कंपनी आहे. याच बेरिंग बनवण्यासाठी एक मोठी मशीन आमच्या इथे मिळेल, असे आरोपींनी शिंदे यांना बनावट मेलद्वारे सांगितले होते. तसेच फोन करुनही शिंदे यांच्यासोबत बातचित केली होती. याच अनुषंगाने आरोपींनी शिंदे यांना पाटण्यात बोलवून घेतले. शिंदे हे पाटण्यात गेल्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यांना एका शेतात नेण्यात आले. तिथे आरोपींनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. पण ते पैसे न मिळाल्याने आरोपींनी शिंदे यांची हत्या केली. पाटणा पोलीस या प्रकरणी तपास करत होते. पाटण्यातील 3 ते 4 जणांनी या प्रकरणी कट रचला होता.
साडेचार लाख तक्रारी;
साडेसहाशे कोटी वाचवले,
50 जणांचे जीव वाचवले
महाराष्ट्र सायबर विभागाने सहा वर्षांत साडेचार लाखांहून अधिकच्या तक्रारींत आतापर्यंत साडेसहाशे कोटी रुपये वाचवले आहेत. तर दुसरीकडे याच हेल्पलाईनमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणार्या 50 जणांचे जीव वाचवल्याचे सायबर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांनी तीन दिवसांपूर्वी सांगितले होते.आता मात्र उद्योगपतीच्या हत्येने सायबर पोलिसांपुढे नवे आव्हान उभे राहिल्याचे म्हणता येईल. यामध्ये सायबर हेल्पलाईन 1930 बरोबर 1945 महत्वाची भूमिका बजावत आहे,असा दावाही त्यांनी केला होता.
अॅपमुळे मिळणार अलर्ट
सायबर पोलिस लवकरच त्याांची अॅप सेवा सुरू करणार आहेत. या अॅपद्वारे त्याांना एखादी लिंक सुरक्षित आहे की नाही, हे समजणार आहे. त्याामुळे हे अॅपदेखील सायबर गुन्हे रोखण्यास महत्त्वााचे ठरणार असल्याची आशा सायबर पोलिसांनी वर्तवली. घिबली पडू शकतो महागात गेल्या काही दिवसांत घिबली इमेजची वाढती क्रेझ पाहता सायबर भामट्यांनीही फसवणुकीसाठी मोर्चा वळवलेला दिसत आहे. त्याामुळे या इमेजसाठी आपली माहिती शेअर करू नका, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे. यासह ऑनलाइन तिकिटांचा काळाबाजार, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टविरुद्ध सायबर पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
राजकीय नेतेही असुरक्षित!
बिहारमध्ये एका आमदाराला डिजीटल अरेस्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय जनता दलाचे बिहारमधील विधान परिषदेचे (एमएलसी) सदस्य मोहम्मद शोएब यांना त्यांच्या पाटण्यातील निवासस्थानी सायबर गुन्हेगारांनी डिजिटल पद्धतीने अटक केली होती. इतकेच नाही तर अटकेदरम्यान त्याांच्याकडून वैयक्तिक माहिती देखील काढून घेतली.शोएब यांच्या तक्रारीनंतर आरोपींने त्याांच्यावर दबाव टाकला आणि घरातून बाहेर पडल्यास किंवा इतरांची मदत घेण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई बरोबरच अगदी मृत्यूची देखील धमकी दिली.