जिनिव्हा / नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने फायजर-बायोटेक लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी दिली आहे. कोरोना महामारीनंतर डब्लूएचओकडून एखाद्या लसीला मंजुरी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. डब्लूएचओच्या या निर्णयानंतर अनेक देशांसाठी मार्ग मोकळा झाला आहे की, ते फायजर-बायोटेक लसीच्या आयातीला मंजुरी देऊन वितरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.
कोरोना लसीची जागतिक पोहोच सुनिश्चित करण्यासाठी हे एक अतिशय सकारात्मक पाऊल आहे,’ असे डब्लएचओचे वरिष्ठ अधिकारी मॅरिएंगेला सिमाओ यांनी म्हटले.
जागतिक आरोग्य संघटनेने फायझर आणि बायोटेकच्या कोरोना व्हायरस लसीला आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. मंजुरीनंतर, डब्ल्यूएचओने सांगितले की ते जगभरातील त्यांच्या प्रादेशिक कार्यालयांद्वारे लसीच्या फायद्यांविषयी तेथील देशांशी चर्चा करेल.
संयुक्त राष्ट्राच्या या संघटनेच्या या मंजुरीनंतर जगभरातील देशांमध्ये फायझरच्या कोरोना लसीच्या वापरासाठीचा मार्ग खुला झाला आहे. त्याचबरोबर कोरोना व्हायरस लशीच्या आपत्कालीन वापरासंदर्भात भारतही मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
डब्ल्यूएचओने गरीब देशांमध्ये कोरोना लस जलदगतीने पोहोचविण्यासाठी आपत्कालीन उपयोग यादी प्रक्रिया देखील सुरू केली आहे. या यादीमध्ये सामील झाल्यानंतर, जगभरातील देशांमध्ये आपत्कालीन वापरासाठी कोणतीही कोरोना लस सहज मंजूर केली जाईल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ब्रिटनने सर्वात आधी म्हणजेच 8 डिसेंबरला या लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन युनियनच्या देशांनीही या लसीच्या वापराला मंजुरी दिली होती.
डब्लूएचओने म्हटले आहे की, कोरोना महामारी आल्यानंतर संघटनेकडून इमर्जन्सी वापराला मंजुरी देण्यात आलेली फायजर-बायोटेक ही पहिलीच लस आहे.
दुसरीकडे, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची (सीडीएससीओ) विषय तज्ज्ञ समिती लसीच्या मंजुरीसंदर्भात आज एक मोठी बैठक घेणार आहे. या बैठकीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, फायझर आणि भारत बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या लसींचा आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.
डब्ल्यूएचओने फायझर लशीचा आढावा घेतल्यानंतर सांगितले की या लसीने सुरक्षा आणि कार्यक्षमतेचे निकष पूर्ण केले पाहिजेत. या लसीचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यताही कमी होते. संस्थेने असेही म्हटले आहे की आम्ही ही लस लवकर मंजूर केली आहे कारण तिचा डोस सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यास उशीर होऊ नये. डब्ल्यूएचओच्या ॲक्सेस टू मेडिसीन प्रोग्रामचे प्रमुख मारियाआंगेला सिमाओ म्हणाले की, कोविड-१९ लसीपर्यंत जागतिक स्तरावर प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी हे एक अतिशय सकारात्मक पाऊल आहे.