Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पोहरादेवीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पोहरादेवीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

admin
Last updated: 2025/04/07 at 5:37 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

वाशिम, 7 एप्रिल (हिं.स.)।

बंजारा समाजाचा इतिहास शौर्य, पराक्रम व त्यागाचा आहे. बंजारा काशी पोहरादेवी या पवित्र स्थळाच्या विकासासाठी राज्य शासनाने नंगाराभवन, संस्कृती परंपरेचे दर्शन घडविणारे संग्रहालय अशी अनेक कामे पूर्ण केली. येथील उर्वरित कामेही लवकरच पूर्ण केली जातील. निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

श्रीराम नवमी आणि संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा बंजारा काशी पोहरादेवी येथे झाला. काही तांत्रिक अडचणींमुळे मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाला दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, धर्मगुरू परमपूज्य बाबूसिंग महाराज, उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार सईताई डहाके, संजय कुटे, राजेश राठोड, तुषार राठोड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रभू श्री रामचंद्राने सर्व घटकांना एकत्र करत समता, एकता, न्यायप्रियता आदी मूल्य व्यवस्था असलेले आदर्श रामराज्य निर्माण केले. संत सेवालाल महाराज यांनी हा आदर्श अनुसरत प्रत्येकात राम जागविण्याचा प्रयत्न केला.

बंजारा समाज प्राचीन समाज असून, ऋग्वेदातही त्याचा उल्लेख आढळतो. या समाजाचे देशातील प्राचीन काळापासून व्यापार, वाहतूक क्षेत्र समृद्ध करण्याबरोबरच धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. समाजाच्या प्रगतीसाठी शासनातर्फे संत सेवालाल महाराज तांडा सुधारणा समिती, तांड्याला ग्रामपंचायतीचा दर्जा यासह अनेक निर्णय, तसेच नवीन योजना व उपक्रम हाती घेतले आहेत. पोहरा देवी या पवित्र स्थळी भाविकांच्या सुविधेसाठी आवश्यक सर्व कामे पूर्ण केली जातील.

यावेळी मंत्री महाजन, राठोड यांनी श्री जगदंबा मातेचे दर्शन घेतले. तसेच संत सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते.

You Might Also Like

मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश

वर्धा : गांधीवादी संस्थांमध्ये नक्षलवाद्यांची घुसखोरी

राज्यात वातावरणात अस्थिरता; पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा

तामिळनाडूत डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग

पन्हाळगडाचे जतन, संवर्धन व संरक्षणासाठी निधी उपलब्ध करुन देणार – प्रकाश आबिटकर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तिलक वर्माच्या रिटायर्ड आउटवरुन सुनील गावस्कर हार्दिक पांड्यावर संतापले
Next Article ३१ मे रोजी ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२५’ पुरस्कार सोहळा

Latest News

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी
राजकारण July 14, 2025
मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
महाराष्ट्र July 14, 2025
राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार
देश - विदेश July 14, 2025
विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन
देश - विदेश July 14, 2025
चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर
देश - विदेश July 14, 2025
ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन
देश - विदेश July 14, 2025
प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
देश - विदेश July 14, 2025
लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना
Top News July 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?