Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लाडकी बहीण योजनेतील शेतकरी महिलांना आता दरमहा 500 रुपयेच
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

लाडकी बहीण योजनेतील शेतकरी महिलांना आता दरमहा 500 रुपयेच

admin
Last updated: 2025/04/12 at 6:42 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर, 12 एप्रिल (हिं.स.)। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख नऊ हजार ४७८ महिलांनी अर्ज केले होते. त्यांना पहिले तीन हप्ते मिळाले, पण आता निकषांच्या तंतोतंत पडताळणीत अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद करण्यात येत आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील चारचाकी स्वत:च्या नावावर असलेल्या १२ हजार महिला आहेत. याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे २८ हजार महिला लाडक्या बहिणींचाही लाभ घेत होत्या.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यानुसार राज्यातून अडीच कोटी तर सोलापूर जिल्ह्यातून ११ लाखांहून अधिक महिलांनी अर्ज भरले. अनेक महिलांनी अपात्र असतानाही जेवढा मिळतो, तेवढा लाभ घेण्याच्या उद्देशाने अर्ज केले. त्यात परराज्यातील महिला देखील होत्या. विधानसभेच्या निकालानंतर राज्य स्तरावर अशा तक्रारी प्राप्त झाल्यावर निकषांच्या अनुषंगाने पडताळणी हाती घेण्यात आली.

त्यात राज्यभरातील १५ लाखांहून अधिक महिला अपात्र ठरल्या.तर शेतकरी सन्मान निधी योजनांचा लाभ घेणाऱ्या १९ लाख महिला लाडक्या बहिणी योजनेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना सन्मान निधीच्या दोन्ही योजनांमधून दरवर्षी १२ हजार रुपये मिळतात म्हणून उर्वरित सहा हजार रुपये त्यांना प्रत्येक महिन्याला ५०० प्रमाणे लाभ देण्याचा निर्णय झाला. आता आयकर भरणाऱ्या महिलांची पडताळणी राज्यस्तरावरून सुरू असून त्यातील अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ देखील आगामी काळात बंद होणार आहे.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर विमानतळावरून ३० मेपूर्वी उडणार विमान
Next Article सोलापूर – आता विद्यापीठाची २२ नव्हे ३० एप्रिलपासून परीक्षा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?