सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स.)।
सोलापूर शहरातील मंजूर झालेल्या दोन्ही उड्डाणपुलांचे काम प्रलंबित आहेत. याबाबत नॅशनल हायवे अधिकारी, भूमी संपादन विशेष अधिकारी व नगर रचना विभाग यांच्या समवेत आमदार विजय देशमुख यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक घेऊन चर्चा केली.
या बैठकीत छत्रपती संभाजी महाराज चौक ते पत्रकार भवन व जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन पर्यंतच्या उड्डाणपुलाचे पूर्ण बाधित जागेचे हस्तांतरण मनपा कडून 25 मे पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर नॅशनल हायवेकडून 2 महिन्यांत निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्षात काम सुरू करण्याबाबत आमदार विजय देशमुख यांनी इतर संबंधित अधिकार्यांसमवेत चर्चा केले.तसेच सोलापूर शहरातील त्या दोन्ही उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या.
याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सभागृह नेते शिवानंद पाटील आदी उपस्थित होते.