Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोकणात कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचे काम सुरू – हर्षवर्धन सपकाळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

कोकणात कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचे काम सुरू – हर्षवर्धन सपकाळ

admin
Last updated: 2025/03/16 at 8:59 PM
admin
Share
5 Min Read
SHARE

रत्नागिरी, 16 मार्च, (हिं. स.) : कोकणातील सामाजिक वातावरणाचे पडसाद मुंबईत उमटतात. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गात कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे भाजपचे काम सुरू आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

आपल्या कोकण दौऱ्यादरम्यान श्री. सपकाळ यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. औरंगजेब हा क्रूर शासक होता. त्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रश्नच नाही; मात्र त्याला महाराष्ट्राच्या मातीत गाडले असल्याची निशाणी म्हणजे त्याची कबर आहे. ती कबर उखडणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या, मराठ्यांच्या शौर्याची निशाणी पुसून टाकण्यासारखे ठरेल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

ते म्हणाले, राज्यातील भाजपा युती सरकारने आश्वासन देऊनही शेतमालाला भाव दिला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. लाडक्या बहिणींच्या मतांवर सत्तेत आले, पण सत्तेत आल्यानंतर १० लाख बहिणींना लाभापासून वंचित ठेवले आहे. आश्वासन देऊन न पाळणे हे सरकारचे अपयश आहे. भाजपा युती सरकार मस्तीत चालले असून मंत्र्यांमध्ये बेबनाव आहेत, सत्तापिपासू वृत्तीची माणसे सत्तेत आहेत. गँग्ज ऑफ वासेपूरसारखे हे टोळ्यांचे सरकार असून त्याची किंमत मात्र जनतेला चुकवावी लागत आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे.

बीड जिल्ह्यात सरपंचाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली, त्यामागे कोण होता ते जनतेने पाहिले, आता आकानंतर खोक्या आला आहे. एक मंत्री खोटी कागदपत्रे दिल्याप्रकरणी दोषी ठरला आहे, तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री रोज बेताल वक्तव्ये करून राज्यातील शांतता व सौहार्दाला छेद देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, कोकण व मुंबईचा घनिष्ठ संबंध आहे. कोकणातील मराठी बाणा बिघडवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. कोकणात विपुल प्रमाणात खनिज सापडले आहे. ते उद्योगपतींना द्यायचे आहे. त्यात कोकणातील माणूस आडवा येऊ नये म्हणून जातीधर्मात तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ताधारी फक्त उद्योगपतींच्या हितासाठी कोकण उद्ध्वस्त करू पाहत आहे. शक्तीपीठ मार्गसुद्धाउद्योगपतींच्या फायद्यासाठीच केला जात आहे. बहुजन समाजातीला लोकांना गोव्याला तीर्थ पिण्यास पाठवायचे आणि उद्योगपतींना आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात करता यावी यासाठी हा शक्तीपीठाचा घाट घातला जात आहे.

श्री. सपकाळ म्हणाले, देशाच्या व राज्याच्या राजकारणात आघाड्या, युतीची अपरिहार्य आहे, त्याची किंमत काँग्रेसने मोजलेली आहे. युती, आघाडीमुळे कोकणात काँग्रेस निवडणुका लढू शकली नाही. इंडिया आघाडी वा मविआ म्हणून काम करत असताना काही मर्यादा व अडचणी येणे स्वाभाविक आहे. आता कोकणातही पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. सिंधुदुर्गपासून या कामाला सुरुवात झालेली आहे आणि कोकणातही काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहेत.

औरंगजेब हा क्रूर शासक होता, त्याने स्वतःच्या वडिलांना तुरुंगात टाकले, भावाचा खून केला, लहान भावाला वेडे ठरवले. या क्रूरकर्मा औरंगजेबाला मराठी माणसाने या मातीत गाडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आम्हाला प्रमाण आहे, पण भाजपाला शिवाजी महाराजांचा इतिहास व शौर्य पुसून टाकायचे आहे. म्हणून एक प्रवृत्ती औरंगजेबाची कबर उखडून टाका, असे सांगत आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहे, ते शौर्य पुसून टाकायचे षड्यंत्र आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण कोणीच करू नये पण भाजपा पुरस्कृतच त्याचे उदात्तीकरण करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

भाजपा ज्या कुशीत जन्मला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सावित्रीबाई फुले यांना छळणारा विचारही तोच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर याच विचाराने २०० वर्षे महाराजांची समाधी जनतेला कळू दिली नाही. महात्मा जोतीबा फुलेंनी महाराजांची समाधी शोधून काढली. महाराजांचा विचार व कार्य लोकांना कळू नये, हा त्यामागचा डाव होता. भाजपा संविधान मानत नाही, ते सरसंघचालक गोळवलकर यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ मानते, याच पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहिले आहे, ते शिवेंद्रराजेंनी वाचावे. सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहिले ते वाचावे. भाजपाच्या पिल्लावळी छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे यांचा सातत्याने अपमान करत आहेत. अपमान करा व संरक्षण मिळवा, अपमान करा व पुरस्कार मिळवा, हे काम भाजपा करत आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सोलापूरकर व कोरटकरला संरक्षण दिले जाते त्या सरकारमध्ये शिवेंद्रराजे भोसले आहेत. त्यांनी हा अपमान का सहन करावा? महाराजांचा अपमान करणाऱ्या सरकारमधून राजीनामा द्यावा, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

यावेळी आमदार भाई जगताप, ज्येष्ठ नेते माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार हुस्नबानो खलिफे, रमेश कीर, प्रदेश संघटन व प्रशासन उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

You Might Also Like

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री

आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांनी घ्यावी – एकनाथ शिंदे

हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही – एकनाथ शिंदे

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी संकेतस्थळ

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article NCB seizes huge stock of methamphetamine pills worth Rs 88 crore, four arrested एनसीबीकडून 88 कोटी रुपयांच्या मेथमॅफेटाईन गोळ्यांचा मोठा साठा जप्त, चौघांना अटक
Next Article आरएफएल ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?