Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बांगलादेशमध्ये मोठी दुर्घटना, भीषण आगीत ५२ जणांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

बांगलादेशमध्ये मोठी दुर्घटना, भीषण आगीत ५२ जणांचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2021/07/09 at 6:01 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

ढाका : बांगलादेशमध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. आज शुक्रवारी भीषण आग लागून घडलेल्या दुर्घटनेत ५० हून अधिक कामगार लोकांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत हा आकडा ५२ वर पोहोचला आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेने कारखान्याबाहेर आक्रोश केला जात आहे.

A massive blaze in a Bangladesh factory has killed 40 people and injured at least 30 with some people jumping from the upper floors to escape the fire. Dozens still missing: AFP pic.twitter.com/EQvwYDxLld

— ANI (@ANI) July 9, 2021

कारखान्याबाहेर जमलेल्या नातेवाईकांनी व अन्य काही कामगारांचे म्हटले आहे की, आतमध्ये अडकलेल्यांची वाचण्याची शक्यता कमी दिसत आहे. कारखान्यात एक हजारहून अधिक कामगार येथे काम करत होते. मात्र, आगीनंतर बहुतेक जण परत आले. या भयानक दुर्घटनेत कमीत कमी ३० जण जखमी झाले आहेत. एएफपी वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. आगीपासून आपला जीव वाचवण्यासाठी अनेक कामगारांनी कारखान्याच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून उड्या मारल्या आहेत. अद्यापही अनेकजण बेपत्ता आहेत. कारखान्यात सध्या किती लोक अडकलेले आहेत, हे अद्याप समजू शकले नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सायटोमगलो व्हायरसची भीती, सहाजणांना बाधा; लक्षणे आणि विषाणू कसा पसरतो ? https://t.co/kdrx2QBbdO

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021

शेकडो मजुरांचे नातेवाईक चिंतेत व त्रस्त असलेल्या प्रियजनांसाठी फॅक्टरीच्या बाहेर थांबले आहेत. आत अडकलेल्या लोकांना पळ काढणे अवघड होईल, अशी भीती सर्वांना आहे. या कारखान्यात नूडल्स, फळांचा रस आणि कँडी तयार केली जाते. बाहेर जाण्याचा दरवाजा बंद होता. त्यामुळे कामगारांना बाहेर पडणेही कठीण झाले.

अग्निशमन सेवेचे प्रवक्ते देबाशिष बर्धन यांच्या म्हणण्यानुसार, शिडीवरील एक्झिट दरवाजे बंद होते. यामुळे कामगार छतांकडे धावू शकले नाहीत. त्याच वेळी खालच्या मजल्यावर जोरदार आग लागली, त्यामुळे ते खालीही जाऊ शकले नाही.
अग्निशामक दलाचे प्रवक्ते देबाशीष बर्धन यांनी सांगतिले की, आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आम्ही आतमध्ये शोध व बचावकार्य चालू ठेवू आणि एकूण जीवितहानी बद्दल नक्की सांगता येईल. तर, आगीमुळे कारखान्यात मोठ्याप्रमाणावर धूर पसरला आहे. यामुळे अनेकांना श्वास घेण्यासही त्रास झाल्याचे वृत्त आहे.

* दुबईमध्ये जहाजाच्या स्फोटानंतर २५ किमी अंतरावरच्या इमारती हादरल्या

दुबईतील जेबेल अली बंदर हे जगातील सर्वात मोठे बंदर आहे. या बंदरावर बुधवारी (ता. ७) रात्री उशिरा एका मालवाहू जहाजाचा स्फोट झाला. यावेळी बंदरापासून २५ किमी अंतरावर असलेल्या इमारतींच्या भिंती व खिडक्यांना हादरे बसले. दरम्यान, या स्फोटानंतर दोन तासांनी आग आटोक्यात आणली गेली.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #52killed #Bangladesh #fire, #बांगलादेश #मोठीदुर्घटना #भीषणआगीत #५२जणांचा #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अकोला शहराजवळ भीषण अपघात; चौघे ठार
Next Article सोलापुरात 12 जुलैनंतर लहान मुलांना मोफत निमोनिया प्रतिबंधक लस

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?