Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बॉलिवूडमधील ८० टक्के कलाकार ड्रग्जचे शिकारी; मोठे सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

बॉलिवूडमधील ८० टक्के कलाकार ड्रग्जचे शिकारी; मोठे सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर

Surajya Digital
Last updated: 2020/09/13 at 9:55 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासानं वेगळं वळण घेतलं आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील ड्रग कनेक्शन प्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली आहे. रियानं एनसीबीच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासे केले आहे.

बॉलिवूडमधील ८० टक्के कलाकार ड्रग्जचं सेवन करत असल्याचं तिनं चौकशीत सांगितल्यानं अनेक मोठे सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रियानं बॉलिवूडमधील ड्रग्ज केनक्शन उघड करताना अनेक युवा अभिनेते आणि अभिनेत्रींची नावं घेतल्यानं खळबळ उडाली आहे. रियानं सारा अली खान, रकुल प्रीत, डिझायनर सिमोन खंबाटा,निर्माता आणि दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांची नावं घेतल्याची माहिती आहे.

रियाला मंगळवारी अटक होऊन न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तिच्या वतीनं लगेचच जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्या न्यायालयानं तो फेटाळला होता. त्यानंतर रियाचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी बुधवारी रिया तसेच तिचा भाऊ शौविकतर्फे सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले. त्याशिवाय झैद विलात्रा व बसित परिहार या दोन आरोपींतर्फे अॅड. तारक सय्यद यांनी जामीन अर्ज दाखल केले. त्याशिवाय आरोपी दीपेश सावंत व सॅम्युअल मिरांडाचेही अर्ज आले.

या अर्जांवर न्या. जी. बी. गुरव यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली. न्यायाधीशांकडून सर्वांच्या जामीन अर्जांविषयी निर्णय सुनावला, सर्वांचा जामीन कोर्टानं पुन्हा एकदा फेटाळला आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाकडून (इडी) सुरू झाल्यानंतर अमली पदार्थांचे प्रकरणही याच्याशी संबंधित असल्याचे लक्षात आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) तपास सुरू केला. त्यात गुन्ह्यांची माहिती हाती लागल्यानंतर एनसीबीने या सर्वांना अटक केली. हे सर्व सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #80टक्के #कलाकार #ड्रग्जचे #शिकारी #मोठेसेलेब्रेटी #एनसीबी #रडारवर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दीड महिन्यात तिस-यादा रुग्णालयात दाखल
Next Article आमदार प्रणिती शिंदेंनी कंगनाच्या वादग्रस्त विषय केला बेदखल

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?