नवी दिल्ली : जगातील टॉप टेन श्रीमंतांच्या यादीतून मुकेश अंबानी आता बाहेर पडले आहेत. ब्लुमबर्गच्या या आधीच्या यादीत मुकेश अंबानी चौथ्या क्रमांकावर होते. आता मात्र या यादीत ते आऊट होऊन अकराव्या क्रमांकावर गेले आहेत.
मुकेश अंबानींची एकूण मालमत्ता या वर्षी 6 लाख 62 हजार कोटी रूपये होती ती आता 5 लाख 63 हजार कोटींवर आली आहे. त्यामुळे ते आता अकराव्या क्रमांकावर गेले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ओरॅकल कार्पोरशनचे लॅरी एलिसन यांनी या यादीत दहाव्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर मध्ये झालेल्या घसरणीमुळे अंबानी यांचे हे स्थान घटले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 2369 रूपये या विक्रमी उंचीवर गेला होता, पण त्यात आता 16 टक्के घट झाली आहे.
मुकेश अंबानी यांनी फ्युचर ग्रुप विकत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर रिलायन्सच्या शेअरच्या भावात विक्रमी वाढ झाली होती. त्यानंतर ऍमेझॉन कंपनीने रिलायन्सच्या फ्युचर ग्रुप विकत घेण्याच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान दिले आहे.