नवी दिल्ली : नवीन वर्षात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या सोन्याचा दर 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. परंतु 2021 मध्ये सोन्याचा भाव 63,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या सोनं उच्चांकी स्तरावरून जवळपास 6000 रुपये स्वस्त आहे. येणाऱ्या वर्षात सोन्याचा दर आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढणार असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. 2021 मध्ये मदत पॅकेज जाहीर होण्याच्या शक्यतेमुळे सोने दरात वाढ होऊ शकते. रुपयाच्या तुलनेत डॉलरची कमजोरी हेदेखील सोने दर वाढीचं कारण ठरू शकतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
2020 मध्ये आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या बाजारात अनिश्चिततेचं वातावरण होतं. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात मोठी गुंतवणूक करत होते. त्यामुळेच ऑगस्टमध्ये सोन्याचा दर सर्वात उच्चांकी पातळीवर होता. मदत पॅकेज जाहीर झाल्यास, डॉलर कमकुवत होईल आणि त्यामुळे सोन्याचे दर वाढतील. भारत आणि चीनमधील गोल्डची डिमांड येत्या 2021 मध्ये मोठी असेल. या सर्वांचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम होऊन, 2021 मध्ये 60000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज वर्तविला जात आहे.
HDFC सिक्योरिटीजचे सीनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षात सोन्याच्या दरात वाढ होईल. ग्लोबल इकोनॉमिक रिकव्हरीची चिंता पाहता, 2021 मध्ये भारतात मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर सोन्याचा दर 57000 रुपये आणि 63000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आर्थिक गती, सुस्त लेबर मार्केट आणि भक्कम मदत पॅकेज हे घटक सोन्याच्या वाढत्या किंमतींना आधार देणारे घटक असल्याचं, तपन पटेल यांनी सांगितलं.
Commtrendz Risk Management Services चे सीईओ ज्ञानशेखर त्यागारंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा दर 30,100 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यानंतर कोरोनामुळे सोन्याच्या किंमती सतत वाढत थेट 56,191 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचल्या.