Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उद्योगपती अनिल अंबानींना एसबीआयचा मोठा झटका!
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थ

उद्योगपती अनिल अंबानींना एसबीआयचा मोठा झटका!

Surajya Digital
Last updated: 2021/01/07 at 3:04 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानींना स्टेट बँक ऑफ इंडियाने धक्का दिला आहे. एसबीआयने रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स टेलिकॉम आणि रिलायन्स इन्फ्राटेल या तीन कंपन्यांची बँक खाती ‘फ्रॉड खाती’ म्हणून घोषीत केली आहेत. या कंपन्यांच्या बँक खात्यांचे ऑडिट केल्यावर त्यात निधीचा दुरुपयोग, चुकीच्या पद्धतीने हस्तांतरण, अफरा- तफरी झाल्याचं समोर आले. त्यामुळे या खात्यांना ‘फ्रॉड’ यादीत टाकले आहे, असं बँकेने म्हटलं आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स टेलिकॉम आणि रिलायन्स इन्फ्राटेल या तीन कंपन्यांची बँक खाती ‘फ्रॉड खाती’ म्हणून घोषीत करण्यात आल्याची माहिती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने दिल्ली उच्च न्यायालयात दिली आहे. या तिन्ही कंपन्यांची मालकी उद्योगपती अनिल अंबानी यांच्याकडे आहे.

‘एसबीआय’चा निर्णय अनील अंबानी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अनिल अंबानींच्या तीन कंपन्यांच्या बँक खात्यांचे ऑडिट केले असता त्यात निधीचा दुरुपयोग, चुकीच्या पद्धतीने हस्तांतरण आणि अफरा-तफरी झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच तिन्ही खात्यांना ‘फ्रॉड’ यादीत टाकण्यात आलं आहे, असं बँकेने कोर्टात नमूद केलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सुत्रांच्या माहितीनुसार अनिल अंबानी यांच्या तिन्ही कंपन्यांची स्टेट बँकेकडे ४९ हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात रिलायन्स इन्फ्राटेलच्या १२ हजार कोटींच्या थकबाकीचा समावेश आहे. तर रिलायन्स टेलिकॉमने २४ हजार कोटी थकवले आहेत.

एसबीआयच्या या निर्णयामुळे अनिल अंबानी यांना आगामी काळात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. कारण एसबीआयकडून या प्रकरणासाठी फसवणुकीच्या आरोपाखाली कोर्टात सीबीआय चौकशीची मागणी केली जाऊ शकते.

एखाद्या कंपनीचं बँक खातं हे फ्रॉड खातं तेव्हाच घोषीत केलं जातं जेव्हा ते अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) खातं होतं. नियमानुसार फ्रॉड खातं जाहीर झाल्याच्या याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देणं गरजेचं असतं. जर त्या खात्यातून झालेली फसवणूक ही १ कोटींपेक्षा अधिक रकमेची असेल तर ‘आरबीआय’ने सूचना दिल्याच्या ३० दिवासांच्या आत त्याबाबत सीबीआयकडे गुन्ह्याची नोंद करण्यात येते.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #उद्योगपती #अनिलअंबानींना #एसबीआयचा #मोठाझटका!
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र
Next Article विधान परिषद निवडणुकीत झाला गैरप्रकार,ईव्हीएमवर मतदान घ्या, निवडणूक आयोगाकडे धाव

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?