जकार्ता : इंडोनेशियावर संकटाची मालिका सुरूच असल्याची परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वीच विमान अपघात झाल्यानंतर आता सुलावेसी बेटावर मध्यरात्री आलेल्या भूकंपाने देश हादरून गेला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.२ इतकी मोजण्यात आली.
या भूकंपात ३५ जणांचा मृत्यू झाला असून ६०० हून अधिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची भीती असल्याचे म्हटले जात आहे.
इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ६०० जण जखमी झाले आहेत. भूकंपामुळे नुकसान झालेल्या भागाचा आढावा घेतला जात आहे. जखमींची आणि मृतांची संख्या वाढण्याची भीती असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मदत आणि बचाव कार्य जोमाने सुरू असून कोसळलेल्या घराच्या ढिगाऱ्यातून नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भूकंपात एका रुग्णालयाचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे तंबू उभारून नागरिकांवर उपचार सुरू आहेत. जवळपास दोन हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.
या भूकंपाचे केंद्र पश्चिम सुलावेसी प्रातांतील मामुजु जिल्ह्यात जमिनीखाली १८ किमी खोल अंतरावर होते. या भागात समुद्रात ५.९ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप आला होता. शुक्रवारी आलेल्या भूकंपात जवळपास ३०० घरांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भूकंपाचे आफ्टरशॉक्सही जाणवण्याची भीती आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडीत झाला असल्याची माहिती समोर आली आहे.