Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमेरिकेचे मावळते अध्यक्षही म्हणाले ‘आम्ही पुन्हा येऊ’; व्हाईटहाऊस केले खाली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

अमेरिकेचे मावळते अध्यक्षही म्हणाले ‘आम्ही पुन्हा येऊ’; व्हाईटहाऊस केले खाली

Surajya Digital
Last updated: 2021/01/20 at 9:55 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

वाशिंग्टन : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेवटच्या भाषणात राज्याला आणि विरोधकांना उद्देशून ‘मी पुन्हा येईल’ असे म्हटले होते. आता अमेरिकेचे मावळते राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मात्र ‘आम्ही पुन्हा येऊ’ म्हटले आहे. सध्या याचीच चर्चा आहे.

डोनाल्ड ट्रंप यांनी आज व्हाईटहाउस खाली केलं आहे. व्हाईट हाऊस सोडल्यानंतर त्यांना वॉशिंग्टन एअरपोर्टवर गार्ड ऑफ ऑनर दिलं गेलं. आपल्या समारोपाच्या भाषणात ट्रम्प यांनी आपला परिवार आणि मित्रांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, काही ना काही करुन आम्ही पुन्हा परत येऊ. मी आपल्यासाठी नेहमीच संघर्ष करत राहिल, असं ते म्हणाले. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार ट्रम्प स्वत:चा एक नवा पक्ष काढणार असल्याची माहिती आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ आज संपला आहे. व्हाईट हाऊस सोडल्यानंतर ट्रम्प फ्लोरिडातील पाम बीचजवळील आपल्या ‘मार-ए-लागो’ येथे वास्तव्य करणार आहेत. व्हाईट हाऊस सोडताना ट्रम्प यांच्यासोबत पत्नी मेलानिया ट्रम्प उपस्थित होत्या. राष्ट्राध्यक्षपदाच्या चार वर्षाच्या कार्यकाळात ट्रम्प यांनी या ठिकाणी बराच वेळ घालवला होता. त्यामुळे या ठिकाणाला ‘विंटर व्हाइट हाउस’देखील म्हटले गेले. ट्रम्प यांनी सप्टेंबर 2019 मध्ये आपले अधिकृत निवासस्थान न्यूयॉर्क ट्रम्प टॉवरमधून बदलून मार-ए-लागो केले होते. अनेक वर्ष न्यूयॉर्कमध्ये वास्तव्य असलेले ट्रम्प यांनी 1985 मध्ये एक कोटी डॉलरमध्ये हे घर खरेदी केले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, आमच्या कार्यकाळात आम्ही अनेक महत्वाचे निर्णय घेतले. तुम्ही सर्वांनी खूप मेहनतीनं काम केलं. माझ्यासाठी हा कार्यकाळ खूप खास राहिला. आम्ही अमेरिकी सेनेला पुन्हा उभं केलं. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वाधिक टॅक्सचा भरणा केला, असं ट्रम्प म्हणाले. ते म्हणाले की, आम्ही जेवढ्या मेहनतीनं काम केलं तेवढ्या मेहनतीनं कुणी काम करु शकणार नाही. काही ना काही करुन आम्ही पुन्हा परत येऊ. मी नेहमी आपल्यासाठी संघर्ष करत राहील.

ते म्हणाले की, मी नेहमी आपल्यासाठी लढत राहील. या देशाच्या उज्वल भविष्यासाठी काम करेल. मी नवीन प्रशासनाला शुभेच्छा देतो आणि त्यांच्या यशासाठी प्रार्थना करतो. मला वाटतं की त्यांच्याकडे काही चांगलं करण्यासाठी मजबूत पाया आहे. ट्रम्प म्हणाले की, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपली आहे. आपल्याला महामारीचा मोठा फटका बसला. आपण असं काही केलं की मेडिकल क्षेत्रात चमत्कार मानला जातो. आपण 9 महिन्यात कोरोनावर वॅक्सिन तयार केलं, असंही ट्रम्प म्हणाले.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #अमेरिकेचे #मावळते #अध्यक्षहीम्हणाले #आम्हीपुन्हायेऊ #व्हाईटहाऊसकेले #खाली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोदी सरकार नरमले, घेतली लवचिक भूमिका मात्र शेतकरी आंदोलनावर ठाम
Next Article उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु, पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?