मुंबई : कंगना रनौत हिचा धाकड़ सिनेमा 1 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी सिनेमातील कलाकारांचे लूक्स समोर येत आहेत. कंगना रनौत, अर्जुन रामपाल यांच्यानंतर दिव्या दत्ताचा दमदार लूक समोर आला आहे. ज्यात ती अत्यंत बोल्ड आणि हॉट दिसत आहे.
धाकडमध्ये दिव्याने हिरव्या रंगाची साडी नेसली अूसन लाल रंगाचा प्रिटेंट ब्लाऊज घातला आहे. ऑक्सडाईज ज्वेलरीने दिव्याचा लूक अधिकच खुलवला आहे. मात्र यातील दिव्याची पोज बोल्ड असून आणि चेहऱ्यावरील भाव गंभीर आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हे पोस्टर दिव्या दत्ताने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. या पोस्टमध्ये दिव्याने लिहिले की, “ही खतरनाक दिसते. पण ती किती वाईट आहे याचे वर्णन केलेले नाही. धाकड़ सिनेमातील ‘रोहिणी’ च्या भूमिकेतील माझा पहिला लूक सादर करत आहे. हा सिनेमा 1 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल.
यापूर्वी कंगना रनौत आणि अर्जुन रामपाल यांचे लूक निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. या लूक्सला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळाली होती. या सिनेमात अर्जुन रुद्रवीर च्या भूमिकेत दिसणार आहे. यातील अर्जुन अतिशय खतरनाक होता. हातात बंदुक, लेटर जॅकेटमध्ये गँग माफियाप्रमाणे भासत होता.