Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जो बायडन यांनी घेतली राष्ट्रध्यक्षपदाची शपथ, डोनाल्ड ट्रम्प यांची अनुपस्थिती, तामिळनाडूमध्ये आनंदोत्सव साजरा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot News

जो बायडन यांनी घेतली राष्ट्रध्यक्षपदाची शपथ, डोनाल्ड ट्रम्प यांची अनुपस्थिती, तामिळनाडूमध्ये आनंदोत्सव साजरा

Surajya Digital
Last updated: 2021/01/21 at 10:28 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

वॉशिंग्टन : नुकत्याच आटोपलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी बुधवारी अमेरिेकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. वॉशिंग्टनमधील कॅपिटल हिल येथे कडेकोट बंदोबस्तामध्ये झालेल्या सोहळ्यात बायडन यांना अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

शपथविधी सोहळ्याच्या सुरुवातीला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी उपराष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेतली. त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष आणि पहिल्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष बनल्या. दरम्यान, कमला हॅरिस यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचे आजोळ असलेल्या तामिळनाडूमधील गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता विचारात घेऊन या शपथविधी सोहळ्याला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी तब्बल ३५ हजार जवान तैनात करण्यात आले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अमेरिकेची यावेळची अध्यक्षीय निवडणूक आणि त्यानंतरची सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया कमालीची वादग्रस्त ठरली होती. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव समोर दिसू लागताच निवडणूक प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा आरोप केला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी वॉशिंग्टनमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हिंसक गोंधळ घातला होता. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रियाही सुरू झाली होती. दरम्यान, आज मी पुन्हा येईल, असे विधान करत ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसचा निरोप घेतला.

मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले. राजशिष्टाचार म्हणून ट्रम्प हे या सोहळ्याला उपस्थित राहणे अपेक्षित असते. मात्र ते अनुपस्थित राहिले. जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याला अमेरिकेतील अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यांच्यामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन तसेच जॉर्ज बुश हे माजी राष्ट्राध्याक्षही उपस्थित होते.

* तामिळनाडूमध्ये आनंदोत्सव साजरा

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा शपथविधी झाला. यादरम्यान तमिळनाडूतील कमला हॅरिस यांच्या मूळगावी तुलासेंतीरापूरम पेन्गनाडू येथे उत्साहाचे वातावरण होते. कमला हॅरिस यांची आई श्‍यामला गोपालन यांचा जन्म चेन्नईत झाला होता. पीएच.डी करण्यासाठी त्या १९ व्या वर्षी अमेरिकेत स्थलांतरित झाल्या होत्या. तिरुवरुर जिल्ह्यातील तुलासेंतीरापूरम पेन्गनाडू हे हॅरिस यांचे मूळ गाव आहे. तिथे त्यांच्या आईकडचे अनेक नातेवाईक आहेत.

उपाध्यक्षपदी हॅरिस विराजमान झाल्याने गावात उत्साही वातावरण आहे. बुधवारी सकाळीच दहा वाजल्यापासूच तेथे आनंद साजरा करण्यास सुरुवात झाली होती. घरासमोर रांगोळीतून शुभेच्छा दिल्या. गावातील श्री धर्मसंस्था मंदिरात विशेष पूजा व हवन करण्यात आले. त्यानंतर फटाके फोडण्यात आले व लाडू वाटप झाले. हॅरिस यांच्या अभिनंदनाचे फलकही लावले होते, असे सरपंच जे. सूतकर यांनी सांगितले.

 

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #जोबायडन #घेतलीराष्ट्रध्यक्षपदाची #शपथ #डोनाल्डट्रम्प #अनुपस्थिती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, फेसबुक लाईव्हवर मांडले प्रश्न
Next Article शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, टीम इंडियाला क्वॉरन्टाईनच्या नियमातून सूट

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?