मुंबई : उत्तम अभिनय आणि तितकाच खेळकर स्वभाव यामुळे प्रिया बापटने रसिकांच्या मनात वेगळेत स्थान निर्माण केले आहे. करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. त्यामुळे तिला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते. नव्या वर्षात ती नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अभिनेत्री प्रिया बापट एका इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. आदित्य कृपलानीच्या या कलाकृतीचे नाव ‘फादर लाइक’ असे आहे. नववर्षात सिनेसृष्टी सज्ज झाली आहे. त्यातच अनेक कलाकार आपल्या नव्या प्रोजेक्ट्सला घेऊन खूप उत्साही आहेत. मराठी सिनेसृष्टीतील कलाकार नवनव्या चित्रपटांची घोषणा करत आहे. यावर्षात अभिनेत्री प्रिया बापटनेही एक नवे आव्हान स्वीकारले असून ती आंतरराष्ट्रीय सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. प्रियाच्या या कलाकृतीबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे. आदित्य कृपलानीच्या या कलाकृतीचं नाव ‘फादर लाइक’ असं आहे. पुढच्या महिन्यात सिंगापूर इथं याचं चित्रीकरण सुरू होणार आहे. पहिल्याच इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी प्रिया उत्सुक आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘काकस्पर्श’, ‘टाईमपास-२’, ‘टाईम प्लीज’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘वजनदार’ या मराठी चित्रपटांबरोबरच ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.
परदेशात चित्रित होणाराही हा माझा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी माझ्या कुठल्याही मराठी वा हिंदी चित्रपटाचं चित्रीकरण परदेशात झालेलं नाही. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. सध्या व्हिसा आणि इतर गोष्टींची तयारी मी करते.
ऑडिशनमध्ये मला आठ शूट द्यावी लागली. त्यामध्ये माझी निवड होण्यापूर्वीच मी कुठे तरी या भूमिकेशी जोडली गेले. आदित्यनं निवड होण्यापूर्वीच कथा सगळ्या कलाकारांच्या हाती दिली. माझी निवड झाली याचा मला आनंद आहे.’ तिच्या या कलाकृतीबद्दल चाहत्यांना उत्सुकता असणार आहे.
* प्रिया बापट म्हणते….
याबाबत प्रिया बापट म्हणाली, हा माझा पहिलाच इंग्रजी चित्रपट आहे. परदेशात चित्रित होणाराही हा माझा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी माझ्या कुठल्याही मराठी वा हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण परदेशात झालेले नाही. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. सध्या व्हिसा आणि इतर गोष्टींची तयारी मी करते. ऑडिशनमध्ये मला आठ दृश्य द्यावी लागली. त्यामुळे माझी निवड होण्यापूर्वीच मी कुठे तरी या भूमिकेशी जोडली गेले. आदित्यने निवड होण्यापूर्वीच कथा सगळ्या कलाकारांच्या हाती दिली. माझी निवड झाली याचा मला आनंद आहे.’ प्रिया बापटचे चाहते तिच्या नव्या प्रोजेक्टबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे.