मुंबई : दिल्लीतील हिंसक शेतकरी आंदोलनावर अभिनेत्री कंगना रणौत म्हणाली, की ‘लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला आहे. हे दहशतवादी जे स्वत: ला शेतकरी म्हणतात त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. आज जगात आपली थट्टा होत आहे. आपली काहीच इज्जत राहिलेली नाही. या देशाचं काहीच होणार नाही. त्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका. त्यांचे समर्थन करणाऱ्यांना जेलमध्ये टाका. त्यांची संपत्ती देखील हिसकावून घ्या’.
बॉलिवूड अॅक्ट्रेस कंगना रणौत आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोशलवर ती कायमच अॅक्टीव्ह असते. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर ती भाष्य करतच असते. अनेकदा ती वादातही सापडली आहे. आज पुन्हा एकदा तिनं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना घेऊन ट्विट केलं ज्यामुळं ती चर्चेत आली आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांकडून रॅली काढण्यात आली होती. ही रॅली रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रु गॅसचा मारा केला. काही ठिकाणी तर लाठी चार्जही केला गेला. शेतकऱ्यांविरोधात घेतल्या गेलेल्या या अॅक्शनचा अनेक सेलेब्सनं विरोध केला. अलीकडचे कंगनानंही शेतकऱ्यांवरून ट्विट केलं.
काही तरी लाज बाळगा असं कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणाली आहे. ट्विटमुळं कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगना आपल्या ट्विटमध्ये लिहिते की, कळप बनून राहिलेत. आडाणी, गल्लीत कोणाच्या घरी लग्न असो किंवा चांगला सण आला असेल तर जळके ताऊ, काका, काकू कपडे धुणं, किंवा मग लहान मुलांना अंगणात शौचास बसवणं किंवा खाट टाकणं, भर अंगणात दारु पिऊन नागडं होणं. हेच हाल झालेत या देशाचे. आज तरी लाज बाळगा. कंगनानं आपल्या ट्विटमध्ये रिपब्लिक डे चा हॅशटॅगही वापरला आहे.
कंगनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या ट्विटची खूप चर्चा सुरू आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शेतकरी रॅलीबद्दल बोलायचं झालं तर ही रॅली दिल्लीच्या आयटीओ आणि नंतर लाल किल्ल्यापर्यंत पोहोचली. लाल किल्ल्याच्या आत जाऊनही गोंधळ झाला. पोलिसांनी याआधी असा दावा केला होता की, दिल्लीला येणाऱ्या सर्व बॉर्डर सील आहेत. परंतु शेतकरी आंदोलन नियंत्रणाबाहेर झालं. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांच्या मते, गाझीपूर बॉर्डर जवळ शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले होते. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीचेही काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात पोलीस शेतकऱ्यांवर लाठी चार्ज करताना दिसले होते.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणैत हिने प्रतिक्रिया दिली आहे. कंगना रणैत म्हणाली की, आज प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हल्ला करण्यात आला. तिथे खलिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला आहे. कोरोना संकटावर आपण यशस्वी मात करत पुढे गेलो. याशिवाय या संकट काळात आपण पूर्ण जगाचं प्रतिनिधित्व करत आहोत. मोजक्याच देशांना हे यश मिळालं आहे. त्याच देशांपैकी आपण एक आहोत, असं कंगनाने व्हिडिओद्वारे सांगितलं.
कंगना पुढे म्हणाली की, लाल किल्ल्याचे फोटो येत आहेत. हे दहशतवादी जे स्वत: ला शेतकरी म्हणतात त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. सर्वांसमोर हा तमाशा सुरु आहे, अशी टीका कंगनाने केली आहे. आज जगात आपली थट्टा होत आहे. आपली काहीच इज्जत राहिलेली नाही. जेव्हा दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष देशात येतो तेव्हा काही लोकं नागडं होऊन बसतात. या देशाचं काहीच होणार नाही. कुणी या देशाला एक पाऊल पुढे घेऊन जात आहे, तर काही लोक देशाला दहा पावलं मागे खेचत आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांना जेलमध्ये टाका. त्यांची संपत्ती देखील हिसकावून घ्या, असं विधानही कंगानाने केलं आहे.