Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: साऊथ कॉमेडी कलाकार पद्मश्री ब्रम्हानंद यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

साऊथ कॉमेडी कलाकार पद्मश्री ब्रम्हानंद यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Surajya Digital
Last updated: 2021/02/02 at 9:43 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : साऊथ चित्रपट विश्वातील कॉमेडी कलाकार ब्रम्हानंद यांनी नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. ब्रम्हानंद हे असे कलाकार आहेत, ज्यांनी एक हजारहून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदलं गेलं आहे. तसेच देशातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी ते एक आहेत. दरम्यान, चित्रपटात येण्यापूर्वी ते तेलगू विषयाचे प्राध्यापक होते.

भारतीय चित्रपट सृष्टीत प्रत्येक कलाकाराची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. काही कलाकार वर्षातून 1 तर काही कलाकार वर्षात पाच चित्रपटही करतात. सर्वात जास्त चित्रपट करणाऱ्याच्या यादीमध्ये आपल्याला लगेच अक्षय कुमार आठवतो. अक्षय वर्षाला 3 ते 5 चित्रपट करतो. पण साऊथ चित्रपट विश्वात ब्रह्मानंदम नावाचा असा कॉमेडी कलाकार आहे, जो सुपरस्टारपेक्षा कमी नाही. त्यांचा चाहता वर्ग संपूर्ण देशात विखुरलेला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

साऊथ चित्रपट विश्वातील बहुतांशी चित्रपट ब्रह्मानंदम शिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. साऊथच्या बहुतांशी चित्रपटात ब्रह्मानंदची छोटीशी का होईना पण त्याची भूमिका असतेच असते. आपल्या या छोट्याशा भूमिकेनेही ब्रह्मानंदम दर्शकांचं लक्ष वेधून घेतो. ब्रह्मानंदम पृथ्वीतलावरील असा एकमेव अभिनेता आहे, ज्याने 1 हजाराहून अधिक चित्रपटात काम केलं आहे. याचीच दखल म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ब्रह्मानंदमचं नोंदलं गेलं आहे. अशा या महान कलाकाराचा आज वाढदिवस आहे.

ब्रह्मानंदम यांचा जन्म जानेवारी   1956 मध्ये सत्तेनापल्ले येथे झाला होता. आज त्यांचा 65 वा वाढदिवस आहे. ब्रह्मानंदम चित्रपटात येण्यापूर्वी तेलगू विषयाचे प्राध्यापक होते.  त्यांनी   1987 साली ‘अहा मेरी शादी’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. आज 34 वर्षांनंतर ब्रह्मानंदम साऊथ चित्रपट सृष्टीतील कॉमेडीचा किंग म्हणून नावारुपाला आहे.

* शिल्पकलेची आवड, पद्मश्रीने सन्मानित

अभिनयासोबतच ब्रह्मानंदमला शिल्पकलेची आवड आहे. ब्रह्मानंदमच्या चेहऱ्यावरील केवळ हावभावही लोकांना हसायला प्रवृत्त करतात. ब्रह्मानंदमने आपल्या डायलॉग डिलीव्हरीच्या टायमिंगने चाहत्यांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ब्रह्मानंदम हा देशातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांच्याबाबत आणखी एक बाब प्रसिद्ध आहे, ती म्हणजे ते 7 वाजल्यानंतर घरातून बाहेर पडत नाहीत. असं म्हटलं जात की, 997 चित्रपट झाल्यानंतर त्यांनी चित्रपटाची गणना करणं सोडलं होतं. ब्रह्मानंद यांनी चित्रपट सृष्टीसाठी दिलेलं योगदान लक्षात घेवून भारत सरकारने त्यांना  2009 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं आहे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #साऊथकॉमेडी #कलाकार #पद्मश्री #ब्रम्हानंद #गिनीजबुकऑफवर्ल्डरेकॉर्डमध्ये #नोंद
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नातेपुते -दहिगांवरोडवर भीषण अपघात, डिझेलने पेट घेतल्याने तीन तरूण जागीच ठार
Next Article चिथावणीखोर वक्तव्य, शरजील उस्मानीवर पुण्यात गुन्हा दाखल

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?