नवी दिल्ली : आगामी १ एप्रिल पासून सुरू होणारं आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये दरवाढीचं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. ICRA च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. ग्राहकांचं २ जी मधून ४ जी मध्ये अपग्रेडेशन होत असल्याने दरवाढीमधून अॅव्हरेज रेव्हेन्यू युझरमध्ये सुधारणा होऊ शकते. दरम्यान, पुढील दोन वर्षांमध्ये या क्षेत्राचा महसूल ११ ते १३ टक्के आणि आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ऑपरेटिंग मार्जिन जवळपास ३८ टक्के वाढेल, असा अंदाज आहे.
मोबाईल फोनचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्या पुढील एक किंवा दोन तिमाहीत आपल्या टॅरिफमध्ये वाढ करण्याच्या तयारी आहेत. आगामी १ एप्रिल पासून सुरू होणारं आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये आपला महसूल वाढवण्यासाठी टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा दरवाढीचं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसंबंधी माहिती देणारी कंपनी ICRA च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. यापूर्वी गेल्या वर्षीही काही कंपन्यांनी आपले टॅरिफ वाढवले होते. कोरोना महासाथीच्या काळात अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसला होता. परंतु टेलिकॉम क्षेत्रात याचा परिणाम तुलनेनं कमी दिसून आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांचं 2G मधून 4G मध्ये अपग्रेडेशन होत असल्या कारणानं दरवाढीमधून एवरेज रेवेन्यू पर युझरमध्ये सुधारणा होऊ शकते, असं ICRA नं म्हटलं आहे. मीडियम टर्ममध्ये हे जवळपास २२० रूपये होऊ शकतं. ज्यामुळे पुढील दोन वर्षांमध्ये या क्षेत्राचा महसूल ११ ते १३ टक्के आणि आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ऑपरेटिंग मार्जिन जवळपास ३८ टक्के वाढेल, असंही सांगण्यात आलं आहे.
ICRA च्या म्हणण्यानुसार कॅश फ्लो जनरेशनमध्येही सुधारणा होणार असून भांडवली खर्चांमध्येही घट झाल्यामुळे बाहेरून कर्ज घेण्याची आवश्यकता कमी भासेल. परंतु एजीआरची रक्कम देण्याव्यतिरिक्त कर्ज आणि पुढील स्पेक्ट्रमच्या लिलावाकडे पाहता टेलिकॉम कंपन्यांवर दबाव कायम राहणार असल्याचं म्हटलं जात आहे.
* लॉकडाऊनचा परिणाम कमी
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला होता. परंतु टेलिकॉम क्षेत्रावर याचा अधिक परिणाम झाला नाही. लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात फिजिकल रिचार्ज उपलब्ध नसल्यां आणि इनकमिंगची सुविधा वाढवण्यात आल्यानं टेलिकॉम कंपन्यांच्या एवरेज रेव्हेन्यू पर युझरमध्ये घट झाली होती.
लॉकडाऊनदरम्यान टेलिकॉम कंपन्यांनी वैधता संपल्यानंतरही रिचार्ज न केल्यास इनकमिंक कॉलची सुविधा बंद केली नव्हती. परंतु काही वेळानंतर वापर आणि टॅरिफमध्ये झालेल्या वाढीमुळे परिस्थितीत सुधारणा झाली. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन स्कूल, ऑनलाईन कंटेन्ट पाहण्यामुळे डेटाचा वापरही वाढला आहे.