मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवून 52 वर्षे झाली. याबद्दलचे एक ट्विट व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन यांना कधी बॉलिवूडचा महानायक तर कधी सिनेमाचे बिग बी म्हणतात. बिगबीनां फिल्म इंडस्ट्रीत 52 वर्षे लोटली आहेत. यानिमित्ताने त्यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे.
अमिताभ बच्चन यांच्या एका चाहत्याने आपली छायाचित्रे शेअर करताना एका ट्विटमध्ये माहिती दिली की, सोमवारी मेगास्टारने सिनेजगतात 52 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यात अमिताभ बच्चन यांची दोन जुनी आणि नवीन छायाचित्रे आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोशल मीडियावरच्या या ट्विटनंतर बिगबीवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. त्यानंतर मात्र बिग बी स्वत: ला प्रत्युत्तर देण्यापासून रोखू शकले नाहीत. त्यानीं रिट्वीट करून या गोष्टीवर शिकामोर्तब केला.
अमिताभ बच्चन यांनी मृणाल सेन यांच्या ‘भुवन शोम’ या चित्रपटातून डबिंग आर्टिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. यानंतर त्यांनी ‘सात हिंदुस्तानी’ मध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केले.
यानंतर ते ‘आनंद पर्वणी’, ‘रेश्मा आणि शेरा’ आणि ‘बॉम्बे टू गोवा’ सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसले. पण ‘जंजीर’ चित्रपटाने अमिताभ बच्चनला एंग्री यंग मॅनची प्रतिमा दिली. तेव्हापासून ते लोकांच्या हृदयात स्थान मिळवून आहेत.