Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 141 गाई, बैलांचे प्राण वाचवले, 11 जणांना अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 141 गाई, बैलांचे प्राण वाचवले, 11 जणांना अटक

Surajya Digital
Last updated: 2021/03/02 at 10:13 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

गडचिरोली : पोलिसांच्या सतर्कतेमुळे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 141 गाई, बैलांचे प्राण वाचले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील जनावरे पाच कंटेनरमध्ये कोंबून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत होते. गाई, बैल, म्हशींना वाचविण्यात पोलिसांना यश आले, तर अनेक जनावरे वाहनात गुदमरून मरण पावली. पोलिसांनी पाचही वाहने जप्त करून 11 आरोपींना अटक केली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या 11 जणांना अटक केली असून 141 जनावरांची सुटका केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून जवळपास 1 कोटी 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 28 फेब्रुवारी रोजी आरमोरी ते ठाणेगाव मार्गावर करण्यात आली. अटक करण्यात आलेले गोवंश तस्कर हे नागपूर, यवतमाळ, तेलंगणा, मध्यप्रदेश राज्यातील आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गुन्हे शाखेने पाच वाहनांतून 141 गाई, म्हशी आणि रेडे किंमत 17 लाख 55 हजार रुपये, 97 लाख किंमतीची 5 वाहने आणि 1 लाख 13 हजारांचे 10 मोबाईल असा एकंदरीत 1 कोटी 15 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत सगणे यांच्या पथकाने केली.

* अकरा अटक आरोपी

अटक करण्यात आलेल्या आरापींमध्ये शाहबाज हमीद खान (वय 23 रा.झू पार्क, बहादूरपुरा, हैदराबाद, अब्दुल अजीज अबदुलरहू (वय 28), रा. गडचांदुर ता. राजुरा, जि. चंद्रपूर, करीम खान नबी खान (वय 37) रा. कलगाव, ता. दिग्रस जि. यवतमाळ, आसीफ मोहसीन कुरेशी (वय 27) रा. पिली नदी, नागपूर, मिर्झा मुजाहीद मुबारक बेग (वय 24) रा. मंडल जेन्नूर, जि. आसिफाबाद, तेलंगणा, ह. मु. लक्‍कडकोट, ता. राजुरा, जि. चंद्रपूर, मिर्झा गफ्फार अनवर बेग (वय 34) रा. उतनुर, जि. आदिलाबाद, तेलंगणा, शेख अस्लम शेख नवाज (वय 19) रा. किरामिरी, जि. आसिफाबाद, तेलंगणा, शेख अस्लम शेख नवाज (वय 19) रा. किरामिरी जि. आसिफाबाद तेलंगणा, लतीफ खान बाबू खान (वय 32) रा. इलियासनगर, जि. आदिलाबाद, तेलंगणा, राजू मदन पाल (वय 45) रा. यशोधरानगर, हनुमान मंदिराजवळ, नागपूर, राजेश हृदयसिंग मडाम (वय 25) रा. नेवसा, ता. बिछिया, जि. मंडला, मध्य प्रदेश, कमलेश उर्फ पिंटू नत्थुलाल गुप्ता (वय 38) रा. नागपूर यांचा समावेश आहे.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

TAGGED: #141cows #transported #slaughter #oxenrescued #11arrested, #कत्तलीसाठी #नेण्यातयेणाऱ्या #141गाई #बैलांचे #प्राणवाचवले #11जणांनाअटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रविवारी झालेली आरोग्यभरती परीक्षा होऊ शकते रद्द, अजित पवारांनी अधिवेशनात दिले मोठे संकेत
Next Article सोलापूर जनता बँक निवडणुकीसाठी परिवार पॅनलच्या उमेदवारांची घोषणा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?