Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लग्नासाठी स्वरा भास्कर तयार, पण घातल्या या अटी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

लग्नासाठी स्वरा भास्कर तयार, पण घातल्या या अटी

Surajya Digital
Last updated: 2021/03/07 at 9:06 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर अविवाहित आहे. आता तिने फोटो शेअर करत लग्नासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. ‘अरेंज मॅरेजसाठी हा फोटो. या मुलीला स्वयंपाक येत नाही. चहा कधी कधी चांगला करता येतो. सोबत एक कुत्रा आहे. ती त्यालाच तिचा मुलगा समजते. कधी कधी तिच्या डोक्यात बंडखोरीचे विषय येतात. आंदोलनजीवी आणि देशद्रोही असल्याचा तिच्यावर आरोप आहे. चांगल्या घरची सून होण्यासाठी उत्तम मुलगी’, असे या फोटोवर लिहिले आहे.

अभिनेत्री स्वरा वेगवेगळ्या गोष्टींसाठी सोशल मीडियावर चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. वेगवेगळ्या गोष्टींवरुन कधी सरकारच्या बाजूनं तर कधी सरकारच्या विरोधात भूमिका घेणारी स्वरा आता वेगळ्या कारणावरुन सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. भलेही स्वराचे म्हणणे बॉलीवूडमधील अनेकांना पटत नसेल पण तिची सर्वांबरोबरची मैत्री सर्वश्रृत आहे. कंगणाची आणि तिची मैत्री तसेच त्या दोघींमधील वादही सर्वांना माहिती आहे. स्वरानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती अनेकांच्या चेष्टेचा विषय ठरली आहे.

* आपल्याला ॲरेंज मॅरेज करायचे

स्वरा अजून अविवाहीत आहे. त्यामुळे आपल्याला लग्नसाठी मुलगा हवा आहे अशा अर्थाची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे ती ट्रोलही होत आहे. स्वरानं आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, आपल्याला तर अॅरेंज मॅरेज करायचे आहे. याप्रसंगी स्वरानं आपलाच एक फोटो शेअर केला आहे. ती म्हणते, या मुलीला स्वयंपाक काही येत नाही. चहा कधी कधी चांगला होतो. तिच्या सोबत एक कुत्राही आहे. त्याला ती आपला मुलगा समजते. तिच्या डोक्यात कधी कधी बंडखोरीचे विषय येतात. त्यानुसार ती आपली भूमिका मांडत असते. तिच्यावर आंदोलनजीवी आणि देशद्रोही असल्याचा शिक्काही मारण्यात आला आहे. अशी एका चांगल्या घरातील मुलाला चांगला नवरा हवा आहे. असे स्वरानं म्हटलं आहे.

* स्वरा आणि कंगना दोघी चांगल्या मैत्रीणी

स्वराच्या या व्टिटला मोठ्या प्रमाणावर चाहत्यांनी कमेंटस दिल्या आहेत. स्वरानंही त्याचा पॉझिटिव्हली पाहिले आहे. दिल्लीत चाललेल्या शेतकरी आंदोलनावर स्वरानं सरकारविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे ती वादाच्या भोव-यात सापडली होती. शेतक-यांना सरकारनं तातडीनं न्याय द्यावा अशी भूमिका स्वरानं घेतली होती. स्वराचा हा अंदाज कंगणाला आवडला नव्हता. तिनं त्याला खडसावले होते. स्वराची भूमिका चूकीची असल्याचे म्हणणे कंगणाचे होते. वास्तविक या दोघी चांगल्या मैत्रीणी आहेत. त्यांनी तनु वेडस मनु नावाच्या चित्रपटात एकत्र काम केले होते.

* किसिंगच्या दृश्यावर राडा

स्वरा तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्यामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सुटेबल बॉय वरुन वाद रंगला होता. त्यात स्वरानं उडी घेतली होती. त्याप्रकरणी स्वरा म्हणाली होती की, मंदिरातील किसिंग सीनवर स्वराने त्या सीनला विरोध करणा-यांना खडे बोल सुनावले होते. यावेळी तिनं कठूआ बलात्कार प्रकरणाची आठवण विरोधकांना करुन दिली होती. बीबीसीची निर्मिती असलेल्या ‘अ सुटेबल बॉय’ या मालिकेला जाणकार प्रेक्षक, अभ्यासक यांची पसंती मिळाली होती. मात्र त्यातील एका किसिंगच्या दृश्यावर काही राजकीय, धार्मिक संघटनांनी घेतलेल्या आक्षेपामुळे ती मालिका वादाच्या भोव-यात सापडली होती. यासगळ्याचा परिणाम म्हणजे ती मालिका प्रसारित करणा-या नेटफ्लिक्सवर बंदी घालण्याची मागणी त्या संघटनांनी केली होती.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #SwaraBhaskar #ready #marriage #laiddown #conditions, #लग्नासाठी #स्वराभास्कर #तयार #घातल्या #अटी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना वाढला; पोलिसात तक्रार
Next Article प्लॅनेटने साजरा केला ‘जागतिक महिला दिन’

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?