Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्लॅनेटने साजरा केला ‘जागतिक महिला दिन’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

प्लॅनेटने साजरा केला ‘जागतिक महिला दिन’

Surajya Digital
Last updated: 2021/03/07 at 9:46 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : मार्च महिना सुरु झाला, की सगळ्यांना वेध लागतात ते महिला दिनाचे. महिला दिन म्हणजे स्त्रीत्वाचा जणू सणच. प्रत्येक स्त्रीच्या आत्मसन्मानाला, तिच्या कर्तृत्वाला एक कृतज्ञता पूर्वक सलाम करण्याचा दिवस म्हणजे महिला दिन. महिला दिन सर्वच स्तरावर, सर्वच क्षेत्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याला मनोरंजनसृष्टी देखील अपवाद नाही. याच महिला दिनाचे औचित्य साधून मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या नायिकांनी एकत्र येत हा दिवस साजरा केला.

प्लॅनेट मराठीचाच एक भाग असणाऱ्या प्लॅनेट टॅलेंटने यावर्षीचा महिला दिन साजरा केला. या वेळी तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, गायत्री दातार, भार्गवी चिरमुले आदी अभिनेत्री उपस्थित होत्या.

 

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याशिवाय प्लॅनेट टॅलेंटमध्ये अमृता खानविलकर, सायली संजीव, शिवानी बावकर यांचाही समावेश आहे. या वेळी उपस्थित तारकांनी मीडियासोबत गप्पाटप्पा, आपले काही अनुभव शेअर करत, गेम्स खेळत, धमाल मजा मस्ती केली. काहींनी त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या स्त्रियांबाबतचे मनोगतही व्यक्त केले. या वेळी सगळ्या अभिनेत्रींनी एकत्र केकही कापला.

या कार्यक्रमाला प्लँनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर देखील उपस्थित होते. या आयोजनाबद्दल अक्षय बर्दापूरकर म्हणाले, ‘खरं तर महिला दिन हा केवळ एकच दिवस साजरा न करता रोजच केला पाहिजे. प्रत्येक महिलेला, मग अगदी ती लहान मुलगी असो, तिला आदराने वागवणे, तिचा सन्मान करणे म्हणजेच महिला दिन. आज महिला दिनानिमित्ताने प्लॅनेट मराठी, प्लॅनेट टॅलेंटच्या परिवारातील महिला, ज्या आमच्यासाठी खूप खास आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने, त्यांचे लाड पुरवण्याच्या उद्देशाने आम्हाला काही विशेष करायचे होते आणि त्यासाठीच या खास सेलिब्रेशनचे आयोजन.”

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #Planet #celebrates #WorldWomen'sDay, #प्लॅनेटने #साजरा #केला #जागतिकमहिलादिन'
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लग्नासाठी स्वरा भास्कर तयार, पण घातल्या या अटी
Next Article सोन्याचा डोंगर सापडला; लोकांची सोनं लुटण्यासाठी गर्दी

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?