Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महिला दिनी महिलांसाठी नीता अंबानी यांनी लाँच केले ‘हरसर्कल’ ॲप
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot NewsTechनिक

महिला दिनी महिलांसाठी नीता अंबानी यांनी लाँच केले ‘हरसर्कल’ ॲप

Surajya Digital
Last updated: 2021/03/08 at 12:59 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी महिलांसाठी ‘हरसर्कल’ (HerCricle )नावाचे एक डिजिटल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. हे मोबाइल आणि डेस्कटॉप या दोन्हीवर आपण पाहू शकता. आपण ते Google Playstore आणि My Jio App Store वरून डाउनलोड करू शकता. यात महिला कल्याण, वित्त, काम, व्यक्तिमत्व विकास, सौंदर्य आणि फॅशन या विषयांवर लेख आहेत.


जागतिक महिलानी दिनाचे औचित्य साधून रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी समस्त महिलांसासाठी ‘हर सर्कल’ हा डिजिटल नेटवर्किंग मंच सुरू केला आहे. हा मंच महिलांना सुरक्षित संवाद आणि परस्पर समन्वय साधण्यास उपयुक्त ठरणार आहे. ‘हर सर्कल’ वरून महिलांसंबंधित माहिती प्रकाशित होणार आहे. ‘हर सर्कल’ हे वेबसाईट आणि ऍप अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे.

रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी यांनी विशेषतः महिलांसाठी तयार करण्यात आलेला डिजिटल प्लॅटफॉर्म ‘हरसर्कल’ला आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने लॉन्च केलं आहे. महिलांचं सशक्तीकरण आणि वैश्विक स्तरावर महिलांच्या उन्नतीसाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सहभाग, नेटवर्किंग आणि परस्पर समर्थनासाठी ‘हरसर्किल’ प्लॅटफॉर्म महिलांना एक सुरक्षित माध्यम ठरेल.


महिलांसाठी जगभरातील डिजिटल गट म्हणून ‘हरसर्कल’ तयार करण्यात आलं आहे. भारतीय महिलांपासूनच याची सुरुवात होणार आहे. दरम्यान, जगभरातील महिलांच्या भागीदारीचा रस्ता यामुळे खुला होणार आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असल्यामुळे हे प्रत्येक वयोगटातील आणि आर्थिक सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या महिलांच्या वाढत्या गरजा आणि त्यांच्या आकांक्षा, महत्त्वकांक्षा आणि स्वप्नांना पूर्ण करेल.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

‘हरसर्कल’च्या लॉन्चिगवेळी बोलताना रिलायन्सच्या चेअरपर्सन नीता अंबानी बोलताना म्हणाल्या की, “महिलाच महिलांची काळजी घेतात, त्यावेळी अनेक अविश्वसनीय गोष्टी घडतात. मी 11 मुलींच्या कुटुंबात वाढले. जिथे मी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले. मी माझी मुलगी ईशाकडून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही अटीशिवाय प्रेम आणि विश्वास ठेवायला शिकले. मी सहानुभूती आणि धैर्य माझी सून श्लोकाकडून शिकले. रिलायन्स फाऊंडेशनमध्ये एकत्र काम करणाऱ्या महिला असो वा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला नेत्या, आमच्या अनुभवांनी मला शिकवलं आहे की, आपला संघर्ष आणि विजय एकमेकांशी गुंफलेले आहेत.”

ते गुगल प्ले स्टोअर आणि माय जियो ऍपवरून मोफत डाऊनलोड करता येईल. त्यावरून महिलांना दैनंदिन गरजांसंबंधी माहिती मिळेल. तंदुरुस्ती, आर्थिक, व्यक्तिमत्व विकास, सौंदर्य , फॅशन, मनोरंजन, एनजीओ अशा विविध क्षेत्रांशी संबंधित माहिती मिळेल.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममार्फत महिला एकमेकींशी संवाद साधू शकतील. इथे व्हिडीओ पाहू शकतील. याव्यतिरिक्त आर्थिक, काही कामं, व्यक्तित्व विकास, मनोरंजन, सर्जनशीलता, स्वत: चं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामुदायिक सेवा, सौंदर्य, फॅशनशी निगडीत आर्टिकल्सही वाचू शकतील. याव्यतिरिक्त महिलांच्या सार्वजनिक जीवनातील सक्रिय सहभागावर आधारित लेखही वाचायला मिळतील. तसेच या प्लॅटफॉर्मवर रिलायन्सच्या विशेषतज्ज्ञांच्या पॅनल मार्फत महिलांना आरोग्य, कल्याण, शिक्षण, उद्योजकता, आर्थिक, परोपकार आणि नेतृत्त्वावर फ्री सल्लाही देण्यात येईल.

दरम्यान, हरसर्कलला डेस्कटॉप आणि मोबाईलवर वापरता येणार आहे. ही एक वेबसाईट आहे. त्याचसोबत गूगल प्ले स्टोअर आणि माय जियो अॅप स्टोअरवर ही वेबसाईट मोफत उपलब्ध होणार आहे. युजर्स यामध्ये फ्री रजिस्ट्रेशन करु शकतात. सध्या ही वेबसाईट इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. दरम्यान, येत्या काळात ही वेबसाईट इतर भारतीय भाषांमध्येही उपलब्ध करण्यात येईल.

* नोकरीच्या संधीसह खूप काही

या प्लॅटफॉर्मवर महिलांना नोकरीच्या संधीही उपलब्ध होती. त्याचसोबत यशस्वी व्यावसायिक बनण्यासाठी काही टिप्सही महिलांना शिकायला मिळतील. हरसर्कलचा सोशल नेटवर्किंग भाग केवळ महिलांसाठीच असेल. दरम्यान व्हिडीओ आणि आर्टिकलचं सेक्शन ओपन फॉर ऑल असेल. याव्यतिरिक्त आर्थिक व्यवस्थापन आणि आरोग्याशी निगडीत प्रश्नांसाठी एक विशेष चॅटरूमही तयार करण्यात आली आहे. तसेच फिटनेस, गरोदरपणा आणि पालकत्व संबंधी विषयांसाठी एक विशेष ‘हर गुड हॅबिट अॅप ट्रॅकर’ही यामध्ये देण्यात येतील.

“आम्ही HerCircle.in मार्फत लाखो महिलांसाठी एक मोठी संधी ठरु शकते. यामध्ये प्रत्येक महिलेचं स्वागत केलं जाईल. चोवीस तास वैश्विक नेटवर्किंग, डिजिटल क्रांती आणि सर्वांच्या मदतीने हरसर्किल महिलांचे विचार आणि त्यांच्या मतांचं स्वागत करेल. समानता आणि समता ही या प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्य असतील.”

नीता अंबानी – अध्यक्षा, रिलायन्स फाऊंडेशन

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #NitaAmbani #launches #Hersercle #app #women #Women'sDay, #महिलादिनी #महिलांसाठी #नीताअंबानी #लाँच #हरसर्कल #ॲप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नाराज काँग्रेस बाहेर पडेल; भाजपा महाराष्ट्रात सत्तेवर येईल
Next Article महिलादिनी अर्थसंकल्पात बरेच काही, शेतक-यासाठीही मोठी भेट, चार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?