Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आरबीआय डिजिटल करन्सी आणणार, आरबीआय गव्हर्नरने दिले संकेत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थ

आरबीआय डिजिटल करन्सी आणणार, आरबीआय गव्हर्नरने दिले संकेत

Surajya Digital
Last updated: 2021/03/14 at 5:38 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : डिजिटल करन्सीबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँक सध्या एका डिजिटल करन्सीवर काम करत आहे. ही करन्सी क्रिप्टोकरन्सी पेक्षा वेगळी असेल. तंत्रज्ञानाच्या युगात आम्ही मागे राहू इच्छित नाही. क्रिप्टोकरन्सी बाबत आमच्या काही चिंता आहेत. तसेच, आम्ही एमएफआय क्षेत्रासाठीही नियमांमध्ये सुधारणा करण्यावरही काम करत आहोत, असेही ते म्हणाले.

भारतात लवकरच भारतीय डिजिटल चलन सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत योजना आखली जात आहे. खुद्द रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीच तसे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, ‘आरबीआय स्वत:चे डिजिटल चलन सुरू करण्याच्या तयारीत आहे. हे चलन क्रिप्टोकरन्सीपेक्षा पूर्णपणे वेगळं असेल. देशात जर डिजिटल चलन सुरू झालं तर बँकांमध्ये होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांवर अंकुश ठेवणं शक्य होईल. त्याचबरोबर कर्जवाटपासोबतच आर्थिक व्यवस्थाही पारदर्शक होईल.’

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आरबीआयने ऑगस्ट 2020 मध्ये प्रसिद्ध केलेल्या वार्षिक रिपोर्टनुसार, 2019-20 मध्ये भारतात बँकांत घोटाळे होण्याचं प्रमाण 159% एवढं वाढलं जे त्याआधीच्या वर्षाच्या 2.5 पटीने अधिक आहे.

टेक महिंद्रा कंपनीतील ब्लॉकचेन आणि सायबर सिक्युरिटी विषयातील तज्ज्ञ राजेश धुडू म्हणाले, ‘देशात ऑनलाइन बँकिंग,UPI ( Unified Payments Interface ) किंवा RTGS ( Real-Time Gross Settlement ) अशा सुविधा सुरू झाल्यानंतरही लोकांच्या व्यवहारांत काहीही बदल झालेले नाहीत.

त्याला कारण हे आहे की यंत्रणेत आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवण्याची व्यवस्थाच नाही आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाणारे व्यवहार हे केवळ कागदी चलनाचं डिजिटल स्वरूप आहे. आज कुणीही व्यक्ती दुसऱ्याला इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पैसे पाठवू शकतो आणि नंतर त्याला रोखीच्या स्वरूपात बदलून घेऊन तो पैसा लपवला जाऊ शकतो.’

सरकार डिजिटल चलनाबाबत काय निर्णय घेतं याची वाट पहायला हवी आणि ते अस्तित्वात आलंच तर त्याचा बँक घोटाळे कमी व्हायला किती फायदा होतो हे बघायला हवं.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #RBI #bringdigital #currency #hints #given #RBIgovernor, #आरबीआय #डिजिटलकरन्सी #आणणार #आरबीआय #गव्हर्नरने #दिलेसंकेत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबई पोलिस अनेक दिवस शोधत होते इनोव्हा; एनआयएने एका दिवसात शोधली
Next Article युवराज सिंगचा धमाका; ठोकले सलग ४ षटकार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?