मुंबई : अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केल्यामुळे गेल्या एक दोन वर्षाच अभिनेत्री तनुश्री दत्ता चर्चेत आहे. तनुश्री पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये सक्रिय होणार आहे. नुकतंच तिनं वजनही कमी केलं आहे. तिच्या नवीन लुकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
तनुश्री सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर ती व्यक्त होत असते. तनुश्री हिने ज्येष्ठ नाना पाटेकर नव्हे तर अभिनेते अमिताभ बच्चन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही लक्ष्य केले होतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती. ती मिळाली नाही, म्हणून त्यांनी गुंडांना एकत्र आणून स्वत:चा पक्ष स्थापन केला’, असा घणाघात तनुश्रीने केला होता. तसंच ‘अमिताभ यांच्यासारखे लोक सामाजिक मुद्द्यांवर सिनेमे करतात. पण प्रत्यक्षात भूमिका घ्यायची वेळ आली की मौन बाळगतात,’ अशा शब्दांत तिनं नाराजी व्यक्त केली होती.
वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली बॉलिवू़ड अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा सिनेसृष्टीत सक्रिय होत आहे. तनुश्रीचा आज वाढदिवस. तनुश्रीनं अनेक सेलिब्रिटींवर आरोप केले आहेत.