मुंबई : अभिनेता आमिर खान याला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत आमिर खानचे प्रवक्ते म्हणाले की, ‘आमिर खानने कोरोनाची चाचणी केली आहे. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती ठीक आहे. तो घरातच सेल्फ क्वारंटाईन झाला आहे. अलिकडच्या काळात त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ची चाचणी घ्यावी’. आमिर सध्या त्याच्या आगामी ‘लालसिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. आमिर सध्या घरीच क्वारंटाइनमध्ये राहत असून सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करत असल्याची माहिती त्याच्या प्रवक्त्यांनी दिली. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांत आमिरच्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असंदेखील त्यांनी म्हटलंय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
२२ मार्च रोजी जागतिक जल दिनाचं औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ स्पर्धेच्या कार्यक्रमात आमिरने हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते.
आमिर सध्या त्याच्या आगामी ‘लालसिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. मात्र कोरोनाची लागण झाल्याने चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. आमिर पूर्ण बरा झाल्यानंतर शूटिंगला पुन्हा सुरुवात होईल, अशी माहिती त्याच्या प्रवक्त्यांनी दिली.