Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फॅक्ट चेक- अजय देवगनला मारहाण ? वाचा सविस्तर काय आहे प्रकरण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

फॅक्ट चेक- अजय देवगनला मारहाण ? वाचा सविस्तर काय आहे प्रकरण

Surajya Digital
Last updated: 2021/03/29 at 11:53 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : दिल्लीत मध्यरात्री दोन गटात झालेल्या हाणामारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत असा दावा केला जात आहे की, मारहाण होत असलेली व्यक्ती अभिनेता अजय देवगन आहे. परंतू ती व्यक्ती अजय देवगन नाही. तान्हाजी’ चित्रपटाच्या प्रमोशननंतर अजय देवगण दिल्लीमध्ये गेलेलाच नाही. या सगळ्या अफवा आणि खोट्या बातम्या आहेत, असं अजयच्यावतीने त्याच्या टीमने जाहीर केले.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला मारहाण केली जात असल्याचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. कार पार्किंगवरुन अजय देवगणचं कर्मचाऱ्यांशी भांडण झालं आणि त्यानंतर हे भांडण मारहाणीपर्यंत गेलं असं दावा या व्हिडीओबाबत केला जात आहे. पण या व्हिडीओमध्ये ज्याला मारहाण केली जात आहे त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्यानं तो अजय देवगणच आहे असं सांगता येत नाही. पण हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्याच्या टीमकडून या व्हिडीओवर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ज्यात हा व्हिडीओ खोटा असल्याचं म्हटलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अजय देवगणच्या टीमनं एक स्टेटमेंट ट्विटरवर शेअर केलं आहे. ज्यात त्यांनी लिहिलं, अजय देवगणचं भांडण आणि मारहाणीबाबत व्हायरल होत असलेला व्हिडीओ खोटा आहे. आम्ही प्रसार माध्यमांना विनंती करतो की, यावर विश्वास ठेवू नये मागच्या अनेक दिवसांपासून अजय देवगण मुंबईमध्येच त्याचे आगामी चित्रपट मैदान, मेडे आणि गंगूबाई काठियावाडीचं शूटिंग करत आहे. मागच्या १४ महिन्यापासून तो दिल्लीला गेलेलाच नाही. जानेवारी २०२०मध्ये ‘तान्हाजीः द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अजय शेवटचा दिल्लीला गेला होता.

या स्टेटमेंटमध्ये पुढे सांगितलं आहे की, अजय देवगण नेहमीच जबाबदारीनं आणि सामाजिक शिष्टाचारांचं भान ठेवून वागतो. हा व्हिडीओ चुकीचा आहे. यात दिसणारी व्यक्ती अजय देवगण नाही. त्यामुळे अशाप्रकारचं कोणतही वृत्त प्रकाशित करण्याआधी सत्य परिस्थिती समजून घ्या.


सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओनुसार दिल्लीमध्ये झालेल्या दोन गटातील मारहाणीत अजय देवगणचं नाव जोडलं जात आहे. एका सोशल मीडिया युझरनं या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. ज्यात पांढऱ्या रंगाचं शर्ट घातलेल्या व्यक्तीला मारहाण केली जात असल्याचं दिसत आहे. मला माहीत नाही हा अजय देवगण आहे की नाही पण शेतकरी आंदोलनाबाबत लोकांमध्ये खूप राग आहे आणि त्यामुळेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओमध्ये अजय देवगण असल्याचा दावा केला जात आहे.’ असं हा व्हिडीओ शेअर करताना त्या युझरनं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #Factcheck #Beating #AjayDevgan? #Read #detailed #whatis #case, #फॅक्टचेक #अजयदेवगनला #मारहाण #वाचासविस्तर #कायआहे #प्रकरण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘पवार साहेब लवकर बरे व्हा! आधारवड’ आहात तुम्ही
Next Article धक्कादायक – कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट, 68,020 रुग्ण आढळले, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?