मुंबई : कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यानं गरीबांना मदतीचा हात पुढे केला. सलमाननं रविवारी राज्यातील तब्बल 5000 लोकांना अन्न आणि पाण्याचं वाटप केलं. युवा सेनेचे सदस्य राहुल एन कानल यांनी सलमानचे अन्न वाटप करत असतानाचे फोटो आणि व्हिडीओ ट्विटरवर शेअर करुन त्याचे आभार मानले आहेत. दरम्यान, सलमानने केलेल्या या मदतीसाठी त्याची सर्वत्र स्तुती केली जात आहे.
https://twitter.com/Iamrahulkanal/status/1386301284093943811?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1386301284093943811%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान कोरोना व्हायरसच्या संकटातील लढाईत महत्त्वाची भूमिका बजावतो आहे. सलमान खान या लढाईत लढणाऱ्या कोरोना वॉरिअर्सची काळजी घेण्यासाठी पुढे सरसावला आहे. सलमानने दिवसरात्र काम करणाऱ्या पोलीस आणि फ्रंटलाइन वर्कर्सच्या मोफत जेवणाची सोय केली आहे. यामध्ये सलमान खानचे फूड ट्रक जेवण घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. सलमानची टीमच नाही तर स्वतः जातीने तो दखल घेत आहे. दरम्यान आता सलमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
व्हिडीओत सलमान खान मरून रंगाच्या शर्टमध्ये दिसतो आहे. या व्हिडीओत तो स्वतः फूड टेस्ट करून पाहतो आहे. यासोबतच फूड पॅकिंग कसे केले याची देखील त्याने तपासणी केली. सलमान खानने नियमांचे पालन करत फूड टेस्ट केल्यावर मास्क घातला आणि त्याच्या या कामातील संपूर्ण टीमदेखील नियमांचे पालन करताना दिसली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सलमान खानचे ‘बिंग हंगरी’ नावाचे फूड ट्रक रस्त्यावर उतरले आहे. याच्यामाध्यमातून हजारो लोकांना जेवण देत आहे. या ट्रकमधून फक्त कोरोना वॉरिअर्सच नाही तर गरीब आणि गरजू लोकांना देखील अन्न दिले जाते.
सलमान खानच्या या अभियानात युवा सेनेचा नेता राहुल कनाल देखील सहभागी आहे. त्याने ट्विट केले की, एक मोठी टीम. तिथे पोहचण्यासाठी सलमान खानचे आभार कसे मानू. तो जेवणाची व्यवस्था पाहण्यासाठी अचानक येतो, तर याहून आणखीन काय पाहिजे. कोरोना योद्धांच्या जेवणासाठी 5000 पाकिटं पाठवली.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1386578183474999298?s=19
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो राधे योर मोस्ट वॉण्टेड भाईचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. यातील सीटी मार हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटानी, रणदीप हुडा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे. राधेशिवाय सलमान खान कभी ईद कभी दिवाली, किक ३ आणि अंतिममध्ये दिसणार आहे.