मुंबई : दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तसेच आपण क्वारंटाईन असून आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करावी आणि काळजी घ्यावी असे आवाहन अल्लू अर्जूनने केले आहे. तसेच घरी राहा, सुरक्षित राहा असेही त्याने म्हटले आहे. दरम्यान बॉलिवूडमधीलही अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली.
'ओ' रक्तगटास कोरोनाचा धोका कमी, हे केवळ निरीक्षण; शास्त्रीय पुरावा नाही https://t.co/56nC0D46VJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
Get well soon…. Thanks for bieng a responsible citizen and inform others👍👍👍
— Suvidha (@mishra_suvidha) April 28, 2021
कोरोना विषाणूचा संसर्ग अतिशय झपाट्यानं वाढू लागला आहे. कलाविश्वालाही या संसर्गानं विळख्यात घेतलं आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानं चाहत्यांना याबाबतची माहिती देत आपल्या प्रकृतीची चिंता न करण्याची विनंती केली. सोबतच आपली प्रकृती लवकरच सुधारेल असा विश्वासही त्यानं व्यक्त केला.
रोमहर्षक सामन्यात दिल्लीचा एका धावेनं पराभव, बंगळुरुचा विजय https://t.co/vV1rGMXK1R
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात येताच त्यानं विलगीकरणात जाण्याचा निर्णय घेत, मागील काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनाही त्यानं कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे. योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानं सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याची विनंती करत, कोरोना लसीकरण मोहिमेतही सहभागी होण्याची विनंती केली.
सर्वांना मोफत कोरोना लस, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मात्र मे महिन्याच्या शेवटी लसीकरण सुरू होणार https://t.co/Sv9pKKCLZD
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
अल्लू अर्जुन यानं सोशल मीडियावर आपण कोरोनाबाधित झाल्याचं सांगताच त्याच्या उत्तम आरोग्यासाठी चाहत्यांनी प्रार्थनेचा सूर आळवल्याचं पाहायला मिळालं. कोणी, गेट वेल सून म्हणत त्याला धीर दिला, तर कोणी त्याला या युद्धात जिंकण्यासाठी सदिच्छा दिल्या. या लोकप्रिय कलाकारापोटी चाहत्यांनी व्यक्त केलेली चिंता आणि त्यांचे संदेश सोशल मीडियावर ट्रेंड करु लागले होते.
राज्यातील पहिल्या महिला आयएफएस अधिकारी बार्शीच्या स्नुषा, सुवर्णा रविंद्र माने-झोळ यांची भारतीय वनसेवेत पदोन्नती https://t.co/XpyIA7P6wp
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021