मुंबई : लग्न म्हटलं की लाखोंचा खर्च आला परंतु एका अभिनेत्याने केवळ 150 रूपयांत लग्न केले आहे. विरफ पटेल असं त्या अभिनेत्याचं नाव आहे. त्याने सलोनी खन्नासोबत लगीनगाठ बांधली. विरफ आणि सलोनी यांनी कोर्ट मॅरेज केले आहे. या दोघांचे लग्न मुंबईच्या वांद्रे कोर्टात झाले. ‘रबर बँडची अंगठी, उधारीची साडी, अँटीबॉडी असणारे साक्षीदार आणि केवळ 150 रुपये! असा पार पडला आमचा लग्नसोहळा’, असे सलोनीने म्हटलं.
https://t.co/6EEFqYNVzB actor Viraf Patel ties the knot with longtime girlfriend Saloni Khanna, see pictures pic.twitter.com/CyqKSLSgdr
— bollywood (@SWAPOND74538165) May 8, 2021
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता विराफ पटेलने अभिनेत्री सलोनी खन्नासोबत लग्न केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विराफ आणि सलोनीने मुंबईतील वांद्रे कोर्टात लग्न केले आहे. एक बूंद इश्क आणि नामकरण मालिकेतील अभिनेता विराफ पटेलने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सलोनीसोबत साखरपुडा केला होता. दोघांची भेट दोन वर्षांपूर्वी एका ऑनलाइन शोदरम्यान झाली होती. त्यानंतर ते दोघे एकमेकांना डेट करू लागले होते.
जगाने सुटकेचा निःश्वास सोडला, चीनचे भरकटलेले रॉकेट समुद्रात कोसळले
https://t.co/x4GNR9h28V— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुख्यमंत्री केजरीवालांची मोठी घोषणा; दिल्लीतील लॉकडाऊन वाढवला #दिल्ली #delhi #lockdown #increase #CM #केजरीवाल #surajyadigital #सुराज्यडिजिटल #kejariwal pic.twitter.com/XRpBFlxMHj
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021
विराफ पटेलने एका मुलाखतीत सांगितले की, या लग्नात त्यांचे कुटुंब झूम मीटिंगच्या माध्यमातून सहभागी झाले. बऱ्याच काळापासून आम्हाला लग्न करायचे होते, पण सध्याचा काळ पाहून आम्ही कोर्ट मॅरिज करण्याचा निर्णय घेतला. यावेळी हेच केले जाऊ शकत होते.
Newly Married TV Couple Viraf Patell & Saloni Khann’s Dreamy PICS From Bandra Court Wedding Amid Covid 19 https://t.co/66WfYrOUrI
— Thakur Chandan Singh (@coolchandan62) May 7, 2021
त्याने पुढे सांगितले की, लग्न करण्याचा उद्देश हाच होता की आम्हाला जीवनात एकत्र पुढे जायचे आहे. आशा आहे की आमचे लग्न यशस्वी होईल आणि आमच्या जीवनात खूप आनंदी राहू. विराफच्या विवाहातील हटके गोष्ट ही होती की अंगठीच्या जागी रबर बँड घालावी लागली.
अभिनेता विराफ म्हणाला की, आता कोरोनाचे संकट आले आहे. सर्वकाही बंद आहे. अशात आम्ही जुगाड शोधला. सर्वात चांगली बाब ही आहे की सलोनीने यासाठी मला मारले नाही. लग्नाचे वृत्त आल्यापासून दोघेही चर्चेत आहे आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलोनी खन्ना पंजाबी आहे आणि विराफ पटेल पारसी आहे.
पंतप्रधान मातृ वंदना योजना! 'या' महिलांना मिळतो लाभ, 'अशी' करा नोंदणी https://t.co/agzPDLiHYV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 9, 2021