नवी दिल्ली : व्हॉट्सॲप नवीन फीचर आणणार आहे. व्हॉट्सॲप वेब वर्जन वापरण्यासाठी, युजर्सला फोनमध्ये इंटरनेट कायम ऑन ठेवावं लागतं. पण या फीचरमुळे इंटरनेट ऑन न करताच, व्हॉट्सअॅप वेब वर्जनचा वापर करू शकतील. व्हॉट्सअॅपच्या वेब वर्जनमध्ये आता युजर्सला क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज लागणार नाही. कंपनी व्हॉट्सअॅप वेब वर्जनसाठी ॲक्टिव्ह मोबाईल इंटरनेट कनेक्शनची अनिवार्यता संपवण्याच्या दृष्टीने काम करत आहे.
मराठा आरक्षण – मुख्यमंत्री ठाकरे राज्यपालांना आज भेटणार https://t.co/X3RVJyUpdx
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
व्हॉट्सअॅप जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅप आता एक असं फीचर आणणार आहे, ज्याची अनेक युजर्सकडून प्रतिक्षा केली जात होती. युजर्स व्हॉट्सअॅपचा वापर फोनसह वेब वर्जनवरही करतात. व्हॉट्सअॅप वेब वर्जन वापरण्यासाठी, युजर्सला फोनमध्ये इंटरनेट कायम ऑन ठेवावं लागतं. परंतु नवं फीचर आल्यानंतर, युजर्स इंटरनेट ऑन न करताच, व्हॉट्सअॅप वेब वर्जनचा वापर करू शकतील.
५० लाख लसी युकेला पाठवण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने फेटाळला https://t.co/j5oEugViAq
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपच्या वेब वर्जनमध्ये आता युजर्सला क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज लागणार नाही. कंपनी व्हॉट्सअॅप वेब वर्जनसाठी अॅक्टिव्ह मोबाईल इंटरनेट कनेक्शनची अनिवार्यता संपवण्याच्या दृष्टीने काम करत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ज्या डेस्कटॉपवर युजर्स व्हॉट्सअॅपचा वापर करत आहेत, त्यावर इंटरनेट असणं अनिवार्य आहे. व्हॉट्सअॅप सध्या या फीचरच टेस्टिंग करत आहे. लवकरच हे फीचर युजर्ससाठी लाँच केलं जाण्याची शक्यता आहे.
अनेक मृतदेह वाहत येत आहेत, युपी बिहारमध्ये खळबळ, संख्या शंभरपर्यत जावू शकते, यूपी -बिहारमध्ये दोषारोप
https://t.co/rQr5G7Aro7— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
रिपोर्टनुसार, ज्या युजर्सनी या फीचरच्या टेस्टिंगमध्ये भाग घेतला आहे, त्यांना एक मेसेज दिसतो. या मेसेजमध्ये, व्हॉट्सअॅप डेस्कटॉप अॅप किंवा वेब वर्जनवर वापरण्यासाठी तुम्हाला फोन कनेक्ट करण्याची गरज नसल्याचं, सांगितलं जात आहे. हे फीचर एकाच वेळी जास्तीत-जास्त 4 डिव्हाईसवर वापरलं जाऊ शकतं.
म्यूकोर्मिकोसिसशी नावाचा आला आजार, ४०% पेक्षा जास्त मृत्यूचा धोका, आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा https://t.co/4a4aUaPLpU
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 11, 2021
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपचं हे नवं फीचर मल्टी-डिव्हाईस फीचरचा भाग असू शकतं. मल्टी-डिव्हाईस फीचरमध्ये युजर व्हॉट्सअॅपच्या एका अकाउंटचा, एकाच वेळी चार डिव्हाईसमध्ये वापर करू शकतात. मल्टी-डिव्हाईस फीचरमध्ये मेन डिव्हाईससाठी इंटरनेट कनेक्शनची गरज भासत नाही. व्हॉट्सअॅप सध्या या फीचरच्या टेस्टिंगवर काम करत आहे.