मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया जूनियर असोसिएट्सच्या कस्टमर सपोर्ट अँड सेलच्या 5 हजार पदांची भरती करणार आहे. ही भरती एसबीआयच्या देशभरातील शाखांमध्ये केली जाणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज सध्या सुरु झाले आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांनी गरजूंसाठी स्वत: लाटल्या पोळ्या https://t.co/IlIlYuYqIz
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in, bank.sbi/careers या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. जर तुम्हाला या पोस्ट्ससाठी अर्ज करायचा असेल, तर या पादाची माहिती जाणून घ्या.
विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू https://t.co/HIfPNTFKuL
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
कोणत्याही विषयातून पदवीधर उमेदवार या पदांवर अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. ज्युनियर असोसिएट्स (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) या पदांच्या उमेदवारांच्या निवडीसाठी, ऑनलाईन प्रिलिम्स परीक्षा, ऑनलाइन मुख्य परीक्षा आणि उमेदवारांनी निवडलेली स्थानिक भाषा परीक्षा घेण्यात येईल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रिलिम्स परीक्षा ही 1 तासाची असणार आहे. यामध्ये इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमता यांच्याशी संबंधित एकूण 100 प्रश्नं असतील. ही परीक्षा 100 गुणांची असणार आहे, तसेच यामध्ये 0.25 गुणांची निगेटिव्ह मार्कींग देखील असणार आहे. प्रिलिम्स परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे.
सोलापूरच्या पाणीप्रश्नावरुन अजित पवारांनी जिल्हाधिका-यांना सुनावले खडेबोल https://t.co/0x9sgqIqOs
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
उमेदवाराला 750 रुपये अर्ज फी भरावी लागेल. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांचे वेतन 17 हजार 900 ते 47 हजार 920 रुपये असेल. परंतु सुरुवातीला 19 हजार 900 रुपये मिळेल.
भारतीय महिलेच्या घरावर रॉकेट हल्ला, व्हिडिओ कॉलवर बोलत असताना मृत्यू, केरळमधील महिलेचा इस्त्रायलमध्ये मृत्यू https://t.co/cNRwvoLqyj
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 12, 2021
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्याशिवाय खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन उमेदवार सहज अर्ज करू शकतात. (https://ibpsonline.ibps.in/sbijascapr21/)