मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीला पती अभिनव कोहलीने मारहाण केल्याचा आणि तिच्याकडून मुलाला हिसकावून घेण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याची दखल आता राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करावा आणि कारवाई करावी, असे निर्देश आयोगाने दिले आहेत. सोबतच 10 दिवसात कारवाईचा अहवालही पोलिसांना सादर करण्यास सांगितले.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील https://t.co/s14fkalDtX
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
दारुच्या नशेत अनेकदा मला आणि मुलीला मारहाण करायचा, असं सांगताना श्वेताच्या अश्रूंचा बांध फुटला. चार तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी अभिनवला अटक केली. मुलगी पलक हिला मोबाइलवर अश्लील फोटो दाखवून तिला शिवीगाळ करत असल्याचंही श्वेतानं सांगितलं.
श्वेताच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनवला पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले आणि तब्बल ४ तास त्याची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी अभिनवविरोधात आयपीसी कलम ३२३, कलम ५०४, कलम ३५४ ए, कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कोव्हिशिल्ड डोसमधील अंतर वाढवले, पुनावालांनी केले स्वागत https://t.co/NL6a08oYZA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
अभिनव हा श्वेताचा दुसरा पती आहे. याआधी तिचा राज चौधरी याच्यासोबत विवाह झाला होता. पलक ही श्वेता आणि राज यांची मुलगी. मात्र, राज दारूच्या नशेत मारहाण करतो म्हणून लग्नानंतर ९ वर्षांनी त्या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१३ मध्ये तिने अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले, या दोघांना रियांशा नावाचा मुलगाही आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिध्द अभिनेत्री श्वेता तिवारीची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. तिला आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीकडून अत्याचाराला सामोरं जावं लागल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे श्वेता तिवारीची चर्चा सुरु झाली. सोशल मीडियावरही त्याबाबतच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी श्वेता आणि तिच्या पतीतील भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर श्वेताच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर कमेंट्स दिल्या होत्या.
विठू-रखुमाईला हापूस आंब्यांची आरास, दगडूशेठ गणपतीला 1,111 हापूस आंब्यांची आरास https://t.co/2QlL3U0lns
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
राष्ट्रीय महिला आयोगानं मुंबई पोलिसांना त्या घटनेची तातडीनं दखल घेण्यास सांगितले आहे. श्वेताच्या बाबत घडलेला प्रकार नेमका काय आहे याचा अहवाल पाठवण्याच्या सुचना केल्या आहेत. श्वेताचा पूर्वाश्रमीचा पती अभिनव कोहलीनं तिला शाररिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता. अभिनवनं त्यांच्या चार वर्षांच्या मुलाला तिच्याकडून हिसकावून घेतल्याचा आरोपही त्यात करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा, लगेच चेक करा, 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 19 हजार कोटी वर्गhttps://t.co/kVPp7MzCOc
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतली आहे. श्वेतानं आपल्याबाबत जो कौटूंबिक हिंसाचार झाला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चाही झाली होती. आयोगानं मुंबई पोलिसांना एक पत्र पाठवले आहे. त्यात असे म्हटले आहे, श्वेता तिवारी प्रकरणाची गंभीरतेनं दखल घ्यावी. आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी श्वेताच्या बाबत जो प्रकार घडला आहे त्याची चौकशी करण्याच्या सुचना मुंबई पोलिसांना दिल्या आहेत.