मुंबई : अभिनेता सलमान खानच्या चित्रपटाला त्याचे चाहते मोठी पसंती देतात. पण यंदा त्याच्यावर एवढी वाईट वेळ आली की, त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘राधे’ हा सर्वात कमी रेटिंगवाला चित्रपट ठरला आहे. आयएमडीबीवर त्याला 2/10 रेटिंग मिळाली आहे. हजारो युजर्सनी या चित्रपटाला फक्त 1 स्टार दिला आहे. तसेच ‘राधे’ पाहणाऱ्या अनेकांनी सोशल मीडियावरून आपले पैसे परत मागितले आहे.. समिक्षकांनाही हा चित्रपट आवडला नाही.
'श्रीमंताघरची सून' अनन्या खऱ्या आयुष्यात आहे फिजियोथेरपिस्ट डॉक्टर https://t.co/68PrNBi7fd
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
सलमान खानने ईदच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा कायम राखली. राधे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. त्यासाठी पैसे घेण्याचे नवीन मॉडेलही काढण्यात आले. मात्र, राधे हा सलमानचा आजपर्यंतचा सर्वात बंडल चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे.
बारावीच्या परीक्षा रद्द करा, सुप्रीम कोर्टात याचिका https://t.co/vxl8lnBdwm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
राधे गुरूवारी झी ५ सह अनेक प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. प्रभुदेवाने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सलमानने एका पोलीस अधिकाऱ्याची दबंग भूमिका साकारली आहे. वॉटेंड या सलमानच्या चित्रपटाचाच हा सिक्वेल असल्याचेही म्हटले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळे सलमनाचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत होते. राधे चित्रपटात दिशा पटनी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूडा यांच्या भूमिका आहेत. रणदीपने यामध्ये खलनायक साकारला आहे. मात्र, सलमानचे अगदी कट्टर चाहतेही राधे पाहून नाराज झाले आहेत.
आज महाराष्ट्रावर मोठे संकट, एनडीआरएफ तैनात #ndrf #maharashtra #संकट #crisis #सुराज्यडिजिटल #एनडीआरएफ #surajyadigital #तैनात pic.twitter.com/LMUDfHxTDh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
इंडियन एक्सप्रेसचे चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ता यांनी राधे ला केवळ अर्धा स्टार दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की प्रभुदेवाच्या चित्रपटात प्रचंड जीवघेणा हिंसाचार असतोच. त्याच्या नायिकांना कपड्यांचीही कमतरता वाटते.
दिशा पठणी हिची भूमिका आहे, असे फक्त म्हणायचे. कारण तिला काही वावच नाही. सलमानची शरीरयष्टी आशाळभूत नजरेने पाहत ती म्हणते तू शरीर कमावले पाहिजे. तरच तुला मॉडेलींगचे काम मिळेल. सर्वच चित्रपट समीक्षकांनी अर्धा किंवा जास्तीत जास्त एक स्टार दिला आहे.
250 देकर राधे फिल्म देखने से अच्छा हैं कि
250 रुपये
इजरायल वेलफेयर में दान कर दूं
— Pawan Kumar Sharma (@spawan994) May 15, 2021
* राधे चित्रपटावर काही ट्वीट
भाऊ, राधे movie खूपच भयानक आहे, त्यापेक्षा FB live बघून time pass करा।
— 🇮🇳 Sᴀnjᴀy (@puffin_pipe) May 15, 2021