मुंबई : सोनाली कुलकर्णीने लग्न केले आहे. आज (१८ मे) वाढदिवशीच सोनालीने कुणाल बेनोदेकर याच्याशी लग्नगाठ बांधलीय. दुबईमध्ये सोनालीने छोटेखानी लग्नाचा कार्यक्रम उरकला. आई-वडील भारतात असल्यामुळे त्यांनी ऑनलाइन मुलीच्या लग्नात हजेरी लावली. सोनालीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. २ फेब्रुवारी २०२० ला त्यांचा साखरपुडा झाला होता. कुणाल दुबईत एका मोठ्या हुद्द्यावर वित्तीय अधिकारी म्हणून काम करतो.
भरती प्रक्रिया प्रमुख अधिकाऱ्यानेच फोडला सैन्य भरतीचा पेपर, आतापर्यंत नऊजणांना अटक https://t.co/BesxZHCuJA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा आज ३३ वा वाढदिवस साजरा करते आहे. मराठी चित्रपटसृष्टील मागील वर्षभरात बरेच सेलिब्रेटी विवाहबंधनात अडकले आहेत. मागील वर्षी सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा पार पडला होता. त्यामुळे ती कधी लग्न करणार आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
फॅनने गायिकेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा केला प्रयत्न, पहा व्हिडिओ, गायिकेने दिले कडक उत्तरhttps://t.co/lbHSC0JKsg
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागील वर्षी कुणाल बेनोडेकर याच्यासोबत साखरपुडा पार पडला. हा साखरपुडा २ फेब्रुवारी २०२० ला दुबईत पार पडला होता. पण सोनालीने तिच्या वाढदिवशी म्हणजे बरोबर एक वर्षापूर्वी तिच्या साखरपुड्याची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोनाली आणि कुणाल लंडनमध्ये नातेवाईकांच्या कार्यक्रमात भेटले होते. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. कुणालने सोनालीला आधी प्रपोज केले होते. त्यानंतर सोनालीने त्याला होकार दिला.
दोन जहाजांच्या मदतीसाठी नौदलाची धाव, 146 जणांना वाचवले https://t.co/zTRfm9Jm1c
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
कुणाल हा दुबईत एका मोठ्या हुद्दयावर वित्तीय अधिकारी म्हणून काम करतो. कुणालचे कुटुंब लंडनमध्ये राहतात तर सोनलीचे कुटुंब भारतात असतात. त्यामुळे त्यांनी दुबईत साखरपुडा केला असल्याचे सोनालीने सांगितले होते. सोनाली आणि कुणालच्या साखरपुड्याला आता वर्ष उलटून गेले आहे. पण अजूनही त्यांनी लग्न केले नसल्यामुळे सोनालीचे चाहते आता तिच्या लग्नाची वाट पाहत आहेत.
सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच झिम्मा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.कोरोनामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलीये.. तर ‘छत्रपती ताराराणी’ आणि फ्रेश लाईम सोडा हे दोन सिनेमे सुद्धा सोनालीनं साईन केलेत.. ज्याचा फर्स्ट लूक तिनं इंस्टाग्रामवर शेअर करत याबाबत चाहत्यांना माहिती दिली होती.
सोनाली आणि कुणाल लग्नबंधनात अडकले.
तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!@meSonalee @Keno_Beno #sonalikulkarni #kunal #wedding #newlywed #sonaleewedskunal #marriage #weddingdiary #celebritywedding #lockdownwedding #fillamwala pic.twitter.com/re5Hd34slN— Fillamwala (@fillamwala) May 18, 2021