प्योंगयांग : उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन आपल्या कडक नियमांसाठी ओळखला जातो. त्यातच आता त्याने उत्तर कोरियाच्या एखाद्या नागरिकाने परदेशी चित्रपट पाहिला तर त्याला मृत्यूदंड ठोठावला जाईल, असा फतवा काढला आहे. तसेच कोणाकडे अमेरिकन, जपानी आणि दक्षिण कोरिया या देशातील व्हिडीओ मिळाले तर त्यालाही मृत्यूची शिक्षा सुनावण्यात येईल. किम जोंग उन परदेशी कपड्यांना, हेअरस्टाईल्सलाही विष मानतो, असं येथील लोक सांगतात.
कोरोनाला रोखण्यासाठी कबुतरं आणि मांजरांना नष्ट करण्याचे आदेश https://t.co/XHwgURhYZf
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
उत्तर कोरियातील अजब नियम, कायद्यांची चर्चा नेहमीच होत असते. उत्तर कोरियामध्ये सध्या एका अजब विधेयक सादर करण्यात आले आहे. या कायद्यानुसार, उत्तर कोरियात परदेशी प्रभाव संपुष्टात आणण्यासाठी परदेशी चित्रपट, कपडे आणि असंसदीय शब्दांचा वापर करण्यास मनाई असणार आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारावासापासून ते मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तिकडे दक्षिण कोरियाई चित्रपट आढळला होता. या गुन्ह्यासाठी त्याला उत्तर कोरियातील प्रशासनाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
किम जोंग उन यांच्या प्रशासनाने प्रतिक्रियावादी विचारांविरोधात कायदा तयार केला असल्याचा दावा केला. उत्तर कोरियातील एखाद्या व्यक्तिने दक्षिण कोरिया, अमेरिका, जपान या देशातील लिखीत, ऑडिओ-व्हिडिओ साहित्य बाळगल्याचे आढळल्यास त्यांना मृत्यूदंड ठोठावण्यात येणार आहे. देशात समाजविरोधी विचारधारांना अटकाव करण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश किम यांनी प्रशासनाला दिले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या युथ लीगमधील युवकांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे.
मोठा गाजावाजा करत सुरु केलेली आयकर विभागाची नवी वेबसाईट 'क्रॅश' https://t.co/yT3Df6CfSt
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 8, 2021
उत्तर कोरियाच्या प्रशासनाकडून देशातील युवकांमध्ये परदेशी भाषण, केशरचना आणि कपड्यांचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दक्षिण कोरियाच्या ‘डेली एनके’ने दिलेल्या वृत्तानुसार, कोरियन पॉपस्टार्स सारखी केशरचना केल्यामुळे अनेक किशोरवयीन मुलांना पुर्नशिक्षण शिबिरात पाठवण्यात येत आहे. उत्तर कोरियाविरोधात बाहेरील देशांमधून सुरू असलेल्या प्रचाराविरोधात किम जोंग यांनी कठोर पावले उचलली आहेत.
या दोन मोठ्या बँकांवर आरबीआयची कारवाई, ठोठावला 6 कोटींचा दंड, अहवालात निष्काळजीपणाचा ठपकाhttps://t.co/vQYd2ei2ZY
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 8, 2021