बंगळुरु : नॅशनल ॲवार्ड विजेता अभिनेता संचारी विजय याचे आज (सोमवार) निधन झाले. तो 37 वर्षांचा होता. शनिवारी रात्री बंगळुरूच्या जवळ त्याचा अपघात झाला होता. अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू आज उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. ‘नानू अवनाल्ला अवालू’ या चित्रपटाद्वारे त्याला प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटासाठी त्याला नॅशनल ॲवार्ड मिळाला होता.
"लोकशाहीतील राजे नीट वागत नसतील तर त्यांना आडवा आणि गाडा" https://t.co/eSZfPmZePF
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
यानंतर विजयचा मोठा भाऊ सिद्धेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार विजयचे अवयव ते दान करणार आहेत. या अवयवांच्या माध्यमातून विजय आपल्यात कायम जिवंत राहतील, अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली. शनिवारी मित्राच्या घरुन परतत असताना विजयचा अपघात झाला होता. विजयच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. याच्या मृत्यूनंतर सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात असून चाहत्यांना देखील रडू कोसळलं आहे. मात्र या अभिनेत्याच्या भावाने जी माहिती दिली त्याने कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. तसेच प्रत्येकाला अभिमान देखील वाटेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सख्ख्या बापाचा पोटच्या मुलांवर गोळीबार, दुस-या मुलाला गोळी घासून गेली https://t.co/6PnyXIUcJV
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
विजय याला बाईकवर फिरायला फार आवडत असे. अशातच शनिवारी सकाळी मित्राच्या घरुन परतत असताना विजय याचा अपघात झाला. यावेळी तेथील लोकांनी त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. विजयच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याचं मोठ्या प्रमाणात रक्त वाहिलं होतं. यामुळे विजय कोमामध्ये गेला.
तब्बल 48 तास डाॅक्टर आणि सर्जननी उपचार करुन देखील उपचारादरम्यानच विजयचा मृत्यू झाला. यानंतर दक्षिणात्य सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगरच कोसळला. 2015 साली ‘नानु अवानल्ला अवालु’ या चित्रपटातून संचारी विजय यांनी आपली ओळख निर्माण केली होती. यामध्ये केलेल्या अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
ठाकरे सरकारचा आदेश, वाखरी ते पंढरपूर असं दीड किलोमीटरच 'पायीवारी' https://t.co/n9R4RcTcds
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
दरम्यान, विजय यांचे मोठे भाऊ सिद्धेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे अवयव ते दान करणार आहेत. या अवयवांच्या माध्यमातून विजय आपल्यात कायम जिवंत राहतील, अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली.