गॅबोरोन : आफ्रिकेतील बोस्टवाना देशात जगातील तिसरा सर्वांत मोठा हिरा ‘देबस्वाना डायमंड’ या कंपनीला सापडला आहे. हा हिरा 1 हजार 98 ग्रॅम कॅरेट असून लांबी 73 मिलिमीटर आणि रुंदी 52 मिलिमीटर आहे. देबस्वाना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लिनेटी आर्मस्टाँग यांनी म्हटलंय की, हे दुर्मिळ आणि अमूल्य रत्न हिरे उद्योग आणि बोस्टवानासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कंपनीच्या पाच दशकांच्या इतिहासात एवढा मोठा हिरा प्रथमच सापडला आहे.
भारतात गूगल मॅपने शोधलं एक रहस्यमय बेट https://t.co/xkvza1PPaj
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021
कंपनीला उत्खननादरम्यान या हिऱ्याचा शोध लागला आहे. 1 जूनला हा हिरा देशाचे राष्ट्रपती मोकगवेत्सी मसीसी यांना दाखवण्यात आला आहे. डेब्सवानाचे व्यवस्थापकीय संचालक लिनेट आर्मस्ट्राँग हिऱ्याबाबत माहिती देताना सांगतात की गुणवत्तेच्या तुलनेत जगातील हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा आहे. हिरा उद्योग आणि बोट्सवानासाठी हा दुर्मिळ आणि विलक्षण दगड महत्त्वाचा ठरणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
did leo make it out this time?
⚡️ “Botswana unearths world's third largest diamond” by @Reuters https://t.co/MavoYPryrb
— Tingha (@tingham14) June 18, 2021
हिऱ्यांच्या खाणीत खोजकाम करताना आफ्रिकेतील बोस्टवाना देशात जगातील तिसरा सर्वांत मोठा हिरा सापडला आहे. जगप्रसिद्ध हिरे कंपनी ‘द बिअर्स’चा एक भाग असलेल्या ‘देबस्वाना डायमंड’ या कंपनीला हा अनमोल हिरा सापडला असून त्याचे वजन एक हजार 98 ग्रॅम कॅरेट आहे. देबस्वाना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लिनेटी आर्मस्टाँग यांनी म्हटलंय की, हे दुर्मिळ आणि अमूल्य रत्न हिरे उद्योग आणि बोस्टवानासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ट्विटरनंतर आता इन्स्टाग्रामवर एफआयआर दाखल https://t.co/1R20RV7BjX
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021
बोट्सवाना हा आफ्रिकेतील सर्वात मोठा हिरा उत्पादक देश आहे. कोरोनामुळे देश आर्थिक संकटात असताना हा हिरा सापडल्याने बोट्सवाना सरकारला दिलासा मिळाला आहे. डेब्सवाना कंपनी आपल्या हिऱ्यांच्या 80 टक्के उत्पन्नाची विक्री सरकारला करते.
वॅनेंग या खाणीतून एक जूनला बाहेर काढलेला हा हिरा गुणवत्तेच्या आधरावर जगातील आतापर्यंतचा तिसरा मोठा हिरा आहे. त्याचा लांबी 73 मिलिमीटर आणि रुंदी 52 मिलिमीटर आहे. बोस्टवानाचे अध्यक्ष मॉकग्वीत्सी मसिसी यांना दाखविला आहे. याआधी ‘कलिनन डायमंड’ हा तीन हजार 106 कॅरेटचा हिरा 1905 मध्ये दक्षिण आफ्रिकेत सापडला होता.
त्यानंतर जगातील दुसरा मोठा हिरा ‘लेसेडी ला रोना’ हा बोस्टवानामध्येच 2014 मध्ये मिळाला होता. एक हजार 109 कॅरेट वजन असलेला हा हिरा टेनिस बॉलच्या आकाराएवढा होता, अशी माहिती ‘देबस्वाना’च्या व्यवस्थापकीय संचालक लिनेटी आर्मस्टाँग यांनी दिली. या हिऱ्याचे मूल्यांकन डायमंड ट्रेडिंग कंपनीकडून काही आठवड्यांत केले जाणार आहे. या हिऱ्याचे नामकरण अद्याप केलेले नाही, असे त्यांनी सांगितले.
कोरोना लशीमध्ये गायीच्या वासराचं सीरम?; मोदी सरकारनं दिलं स्पष्टीकरण https://t.co/4T8EFDDeMT
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021