मुंबई : मिल्खा सिंग यांच्या निधनाने देश शोकसागरात आहे. मिल्खा यांच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणारा फरहान अख्तरने एक भाऊक पोस्ट शेअर केलीय. “तुम्ही या जगात नाहीत हे मी हे स्विकारायलाच तयार नाहीये. तुम्ही प्रेमळ, मोठ्या मनाचे व्यक्ती होता. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आकाशाला स्पर्श करणं शक्य असल्याचं तुम्ही दाखवून दिलं. ज्यांना तुमचा सहवास लाभला नाही त्यांना तुमची कहाणी कायम प्रेरणा देईल. ”
Very sad,heartbreaking to hear flying sikh Sardar Milkha singh ji is no more.. 🙏🙏 waheguru 🙏🙏 #RIPMilkhaSinghji
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) June 18, 2021
“प्रिय मिल्खा जी, तुम्ही आमच्यात नाही हे स्वीकारण्यास माझं मन अजूनही तयार नाही. कदाचित तुमच्यासारखचं माझं मन वागतंय आज, थोडंसं हट्टी, थोडं जिद्दी. तुम्ही एका स्वप्नाचं प्रतिनिधित्व केलं,” अशा शब्दात अभिनेता फरहान अख्तरने महान धावपटू मिल्खा सिंह यांच्या निधनावर आपल्या भावना व्यक्त केल्या. फरहानने मोठ्या पडद्यावर मिल्खा सिंह यांची व्यक्तिरेखा साकारली होती.
दुःखद ! फ्लाईंग सिख, पद्मश्री मिल्खा सिंग यांचे निधन, क्रिडा क्षेत्रात हळहळ https://t.co/uoHJqksEVS
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 19, 2021
जवळपास महिनाभर कोरोनाशी लढा दिल्यानंतर भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांचं चंदीगडमधील रुग्णालयात निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या निधनावर राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून क्रीडा विश्वासह सामान्य नागरिक दु:ख व्यक्त करत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मिल्खा सिंह यांचा बायोपिक ‘भाग मिल्खा भाग’मध्ये त्यांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता फरहान अख्तरने शोक व्यक्त केला आहे. ‘मिल्खा सिंह या जगात नाहीत, यावर विश्वास बसत नाही,’ अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
❤️🙏🏽 pic.twitter.com/Ti2I457epP
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) June 19, 2021
फरहान अख्तरने ट्वीट केलं आहे की, “प्रिय मिल्खा जी, तुम्ही आमच्यात नाही हे स्वीकारण्यास माझं मन अजूनही तयार नाही. कदाचित तुमच्यासारखचं माझं मन वागतंय आज, थोडंसं हट्टी, थोडं जिद्दी, जे मला तुमच्याकडून वारसाहक्काने मिळालंय. सत्य हे आहे की तुम्ही कायमच जिवंत आहात. कारण तुम्ही सहृदयी, प्रेमळ, साधे आहात. तुम्ही एका स्वप्नाचं प्रतिनिधित्व केलं. परिश्रम करुन प्रामाणिकपणा आणि दृढ निश्चयाने एखादी व्यक्ती आकाशाला गवसणी घालू शकते, याचं तुम्ही उदाहरण होता. यशानंतरची तुमची नम्रत आणि तुमचं जीवन अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे.”
काॅमनवेल्थ स्पर्धेत अॅथलेटिक्स मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारे महान खेळाडू, पद्मश्री सरदार मिल्खासिंग यांचे निधन झाले. त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली…!
#MilkhaSingh pic.twitter.com/tc11vaZASx— Surajya Digital (@SurajyaDigital) June 19, 2021
‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. ओम प्रकाश मेहरा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट फ्लाईंग सिख मिल्खा सिंह यांच्या जीवनावर आधारित होता. विशेष म्हणजे मिल्खा सिंह यांनी आपल्या आत्मचरित्राचे हक्क केवळ एक रुपयांना विकले होते. चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
महापौरांचा अवमान, सत्ताधारी भाजप नगरसेवक सभेतून निलंबित https://t.co/cHf9VvxvMk
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021