मुंबई : मुंबईत आज सिने दिग्दर्शक राज कौशल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज (बुधवारी) पहाटे सिने दिग्दर्शक आणि अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं आकस्मित निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पतीच्या अचानक जाण्याने अभिनेत्री मंदिरा बेदीला मोठा धक्का बसला आहे. राज आणि मंदिरा यांचं 1999 साली लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलं आहेत.
https://twitter.com/IamOnir/status/1410084586638372868?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1410084586638372868%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
चित्रपट दिग्दर्शक ओनिर यांनी राज कौशल यांच्या निधनाची माहिती ट्विटरवर शेअर केली आहे. त्यांनी लिहिं आहे की, “आपण दिग्दर्शक आणि निर्माते राज कौशल यांना आज सकाळी गमावलं. अतिशय दु:खद. ते ‘माय ब्रदर निखिल’ या माझ्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक होते. आमच्या व्हिजनवर विश्वास ठेवून पाठिंबा देणाऱ्यांपैकी ते एक होते. देश त्यांच्या आत्म्याला शांती देवो.”
राज कौशल यांच्या आकस्मित निधनाने मंदिरा बेदीला जबरदस्त धक्का बसलाय. राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त आहे. अॅम्ब्युलन्समधून अंतिम संस्कारासाठी घेऊन जाताना मंदिरा बेदी ही राज कौशल यांच्या प्रेतासोबतच होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
https://twitter.com/anshulsunita7/status/1410194977334861833?s=19
पतीच्या आकस्मित निधनाने मंदिरा बेदी पूर्णपणे कोलमडून गेली असून तिला यातून सावरणं अवघड जातंय. मंदिराचा परिवार तिच्यासोबत आहे. राज कौशल यांनी अभिनेता म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.
मंदिरा बेदी आणि राज कौशल यांची पहिली भेट 1966 मध्ये मुकुल आनंद यांच्या घरात झाली होती. मंदिरा तिथे ऑडिशन देण्यासाठी गेली होती तर राज कौशल हे मुकुल आनंद यांचे असिस्टंट म्हणून काम करत होते. तिथूनच त्यांच्या नात्याला सुरुवात झाला. मंदिरा बेदी आणि राज कौशल यांनी 14 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न केलं.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1409862772821684228?s=19