Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मला पॉर्न कंटेंटसाठी कोणतीही विचारणा झालेली नाही – सई
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

मला पॉर्न कंटेंटसाठी कोणतीही विचारणा झालेली नाही – सई

Surajya Digital
Last updated: 2021/07/24 at 2:08 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : पॉर्न, अश्लील व्हिडिओ किंवा वेब सीरीजच्या निर्मितीविषयी कोणतीही विचारणा झालेली नाही, असे अभिनेत्री सई ताम्हणकरने स्पष्ट केले आहे. राज कुंद्रा नवीन ॲपसाठी सई ताम्हणकर आणि शिल्पाची बहिण शमिता शेट्टीचा विचार करत होता, असा धक्कादायक खुलासा गंदीबातफेम अभिनेत्री गहना वशिष्ठने केला होता. त्यावर सई ताम्हणकरने आता स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणात राज कुंद्रा अटकेत आहे.

गहानाच्या दाव्यात काडीमात्र तथ्य नसल्याचं सई ताम्हणकरच्या टीमकडून सांगण्यात आले आहे. राज कुंद्रा प्रकरण आणि त्याच्या कोणत्याही अॅपचा सईचा काहीही संबंध नसल्याचेही सईने स्पष्टीकरण दिले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अ‍ॅपप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अटक केली आहे. नंतर याच पोर्न प्रकरणात जामिनावर बाहेर असलेली अभिनेत्री गहना वशिष्ठने एक धक्कादायक खुलासा केलाय. ती म्हणाली, राज कुंद्रा पत्नी शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टीसोबत काम करणार होता. त्यासोबत गहनाने मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरचं नाव घेतल्याचे वृत्त आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गहनाने माध्यमास नुकतीच धक्कादायक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अनेक गोप्यस्फोट केले. त्यात अनेक अभिनेत्रीची नावे घेतली. त्यात मराठी अभिनेत्री सईचेही नाव घेतले. गहनाने सांगितले की, “तुरूंगात जाण्याच्या काही दिवसांआधी मी राज कुंद्राच्या ऑफिसला गेली होती. त्यावेळी कळले की बॉलीफेम नावाचं एक नवीन अॅप लॉन्च करायच होतं. या अॅपवर आम्ही रिअॅलिटी शो, टॉक शो, म्युझिक व्हिडीओ, कॉमेडी शो आणि साधारण चित्रपट दाखवण्याचा विचार करत होतो. या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिसणार नव्हते. याच दरम्यान, आम्ही स्क्रिप्टवर चर्चा केली होती. त्यानंतर शमिता शेट्टी, सई ताम्हणकर एक-एक स्क्रिप्टसाठी आणि आणखी दोन कलाकारांना कास्ट करण्याचा विचार केला.

* एकता कपूरच्या सीरिजपेक्षाही कमी कामुकता

या आधी गहनाने एक व्हिडीओ शेअर करत राज कुंद्राचे समर्थन केले आहे. “आम्ही पॉर्न व्हिडीओ बनवत नाही. हे सगळे व्हिडीओ एकता कपूरच्या ‘गंदी बात’सारखेच आहेत. आमच्या सीरिजमध्ये एकता कपूरच्या सीरिजपेक्षाही कमी कामुकता आहे. जे चित्रपट प्रदर्शित झाले त्यात कुठेच अश्लिलता नाही. ते अश्लील चित्रपट नाहीत. ज्यांना शंका आहे त्यांनी गुगलवर जाऊन बघावं. त्यापैकी कोणताच चित्रपट पॉर्न श्रेणीत मोडला जाऊ शकत नाही. आमचे प्रेक्षक हे 18 वर्षांच्या पुढचे आहेत. त्यामुळे त्यांना पॉर्न आणि इरॉटिक चित्रपटांमधला फरक कळतो, असे गहना म्हणाली.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

TAGGED: #notreceived #request #porn #content #SAI, #पॉर्न #कंटेंटसाठी #कोणतीही #विचारणा #झालेलीनाही #सई
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऑलिम्पिक गुडन्यूज, भारताला मिळाले पहिले पदक, पदकांचे खाते उघडले
Next Article ‘कोंकण हे फक्त मजा करण्यासाठी नाही’; मराठी अभिनेत्याचे मदतीसाठी आवाहन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?