Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिल्पा शेट्टीला क्लीन चीट नाही; शिल्पाच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुड

शिल्पा शेट्टीला क्लीन चीट नाही; शिल्पाच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या

Surajya Digital
Last updated: 2021/07/28 at 3:43 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : पोलिसांकडून क्लीन चीट नाहीच अश्लील चित्रपटांची निर्मिती आणि प्रसारणाच्या प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणी शिल्पाचीही चौकशी होत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीला अद्याप क्लीन चीट दिलेली नाही. तसंच सर्व दृष्टीकोन लक्षात घेऊन तपास केला जाणार आहे. या प्रकरणामध्ये सर्व खात्यांमधील व्यवहारांची तपासणी सुरु आहे, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, पोलिसांनी या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांना अद्याप क्लीन चिट दिली नाही. शिल्पा शेट्टीला अद्याप क्लीन चीट देण्यात आलेली नाही असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या अधिकाऱ्यानं सांगितलं की, हा तपासाचा भाग असल्याने आणि अकाऊंटची तपासणी केली जात आहे. शिल्पा शेट्टीला अद्याप क्लीन चिट देण्यात आलेली नाही. आमचा कोणाच्याही वैयक्तिक बँक अकाऊंटशी काही संबंध नाही.

कुंद्राचे बँक अकाऊंट आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने फॉरेन्सिक ऑडिटर  नियुक्त केलेत. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीशी संबंधित राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी, अरविंद श्रीवास्तव, हर्षिता श्रीवास्तव आणि इतरांच्या बँक अकाऊंटची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटर्सना बोलविण्यात आलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

राजच्या कंपनीवर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. राजच्या कंपनीवर, हॉटशॉटवर तसेच गहना वशिष्ठ आणि आणखी 4 निर्मात्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मॉडेल आणि अभिनेत्रीने हा गुन्हा दाखल केला आहे. या मॉडेलने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिला मोठ्या सिनेमाचं लालच दाखवून एका अडल्ट सिनेमात काम करवून घेतलं होतं. यानंतर पोलिसांनी तिला एफआयआर दाखल करण्यास सांगितलं कारण ही घटना मालवणी परिसरात घडली होती.

* शिल्पाच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या

पॉर्नोग्राफी कनेक्शन समोर आल्यापासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पॉर्नोग्राफी  प्रकरणी रोज नवे खुलासा समोर येत आहेत. राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  पतीच्या अटकेनंतर शिल्पा सतत चर्चेत आहे. सोशल मीडियावर अनेक मीम्स देखील व्हायरल होत आहेत.  फार कमी लोकांना माहिती आहे की, मध्यंतरी राज आणि शिल्पाच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या.

मी राज कुंद्राला घटस्फोट देत आहे…’ शिल्पाच्या फोनवरून असा मेसेज तिच्या आईला गेला होता. ज्यामुळे शिल्पाची आईला मोठा धक्का बसला. पण नंतर जेव्हा त्यांना खरी परिस्थिती कळाली तेव्हा त्यांना दिलासा मिळाला. खरं तर तेव्हा शिल्पासोबत एक प्रँक करण्यात आला.  शिल्पासोबत हा प्रँक फिल्ममेकर अनुराग बासूने केला होता.

राज कुंद्रासोबत आपलं मोठं भांडण झालं असून लवकरचं त्याला घटस्फोट देत आहोत असं शिल्पा शेट्टीने आईला केलेल्या मेसेजमध्ये म्हटलं होतं. ‘सुपर डान्सर 3’ मध्ये त्यांनी हा खुलासा केला. असं काही झालं आहे याची कल्पना देखील शिल्पाला नव्हती. पण नंतर गीता कपूरने तिला याबद्दल सांगितलं.

त्यानंतर शिल्पाने आईला फोन केला आणि सर्व काही खरं सांगितलं. ‘कधी माझ्या फोनवरून मी प्रेग्नेंट आहे किंवा घटस्फोट घेत आहे, असा मेसेज आला तर समजून जा हा एक प्रँक आहे. कारण अनुराग दादा सेटवर आहे.’ ‘सुपर डान्सर 3’ मध्ये अनुराग बासू, गीता कपूर आणि शिल्पा फार गंमत करायचे.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #ShilpaShetty #cleanchit #Talks #divorce #rife, #शिल्पाशेट्टी #क्लीनचीट #घटस्फोटाच्या #चर्चा #रंगल्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शपथविधी झाला…! कोण आहेत कर्नाटकचे मुख्यमंत्री ?
Next Article पालकांना दिलासा; शाळांची 15 टक्के फी माफ, अकरावी प्रवेश – येथे क्लिक करा व सीईटीसाठी अर्ज करा

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?